
भुवनेश्वर : ओडिशामधील बालासोर येथील फकिरा मोहन शिक्षणशास्त्र महाविद्यालयामधील द्वितीय वर्षात शिकणाऱ्या सौम्याश्री या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी ओडिशातील बिजू जनता दलाच्या (बीजेडी) नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिस आणि बीजेडीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली.