
ओडिशामध्ये पुन्हा एकदा मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे दिल्ली आणि आसाम दरम्यान धावणाऱ्या कामाख्या एक्सप्रेसचे ११ एसी डबे रुळावरून घसरले. त्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. चौधर परिसरातील मंगुली पॅसेंजर हॉल्टजवळ ट्रेन रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत.