Odisha Train Accident : रेल्वे अपघातात 233 जणांचा मृत्यू , तर 900 प्रवासी जखमी; जाणून घ्या आतापर्यंतचे भीषण रेल्वे अपघात

अलिकडच्या वर्षांतील भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात
Odisha Train Accident
Odisha Train Accident Esakal

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ काल (शुक्रवारी 2 जून) संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला आहेया अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. यशवंतपूर-हावडा सुपरफास्टने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या काही डब्यांच्या रुळावरून घसरलेल्या बोगींना धडक दिली आणि ती विरुद्ध रुळावर पडली, असे रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले.(Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर ट्विट करत या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. "मी रेल्वेमंत्र्यांशी बोललो, परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे," असे त्यांनी ट्विट केले आहे.(Latest Marathi News)

भारतातील सर्वात मोठे रेल्वे अपघात

1) 7 जुलै 2011 रोजी उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्याजवळ छपरा-मथुरा एक्स्प्रेसची बसला धडक बसली. या अपघतामध्ये 69 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. हा मध्यरात्री 1.55 च्या सुमारास मानवरहित क्रॉसिंगवर झाला होता. ट्रेन सुसाट वेगाने धावत होती आणि यावेळी बसला धडक बसली.

Odisha Train Accident
Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233, तर 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी

2) २०१२ हे वर्ष भारतीय रेल्वेच्या इतिहासातील रेल्वे अपघातांच्या दृष्टीने सर्वात वाईट वर्ष म्हणून ओळखले जाते. या वर्षी सुमारे 14 अपघात नोंदवले गेले आहेत, ज्यात रुळावरून घसरणे आणि समोरासमोर टक्कर होणे यांचा समावेश आहे.

3) 30 जुलै 2012 रोजी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेसच्या डब्याला नेल्लोरजवळ आग लागली आणि 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

4) 26 मे 2014 रोजी, उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर भागात, गोरखपूरच्या दिशेने निघालेली गोरखधाम एक्स्प्रेस खलीलाबाद स्थानकाजवळ थांबलेल्या मालगाडीला धडकली, या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता तर 50 हून अधिक जखमी झाले होते.

Odisha Train Accident
Coromandal Express : दहा-पंधरा जण अचानक अंगावर कोसळले अन्...; अपघातग्रस्त ट्रेनमधल्या प्रवाशानं सांगितला थरारक अनुभव

5) 20 मार्च 2015 रोजी डेहराडूनहून वाराणसीला जाणाऱ्या जनता एक्स्प्रेसचा मोठा अपघात झाला होता. उत्तरातील रायबरेली उत्तर प्रदेश येथील बचरावन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचे इंजिन आणि दोन शेजारील डबे रुळावरून घसरल्याने 30 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर सुमारे 150 जण जखमी झाले होते.

6) 20 नोव्हेंबर 2016 रोजी इंदूर-पाटणा एक्स्प्रेस 19321 कानपूरमधील पुखरायनजवळ रुळावरून घसरली, या अपघातामद्धे 150 प्रवाश्यांचा मृत्यू झाला होता तर 150 हून अधिक जखमी झाले होते.

Odisha Train Accident
Manipur : पाच जिल्ह्यांमधील संचारबंदी मागे; मणिपूरमध्ये पोलिसांकडे १४० शस्त्रे जमा

7) 19 ऑगस्ट 2017 रोजी हरिद्वार आणि पुरी दरम्यान धावणाऱ्या कलिंग उत्कल एक्स्प्रेसला उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील खतौलीजवळ अपघात झाला होता. रेल्वेच्या 14 बोगी रुळावरून घसरून 21 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर 97 जण जखमी झाले होते.

8) 23 ऑगस्ट 2017 रोजी उत्तर प्रदेशातील औरैयाजवळ दिल्लीला जाणाऱ्या कैफियत एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरले होते त्यामुळे किमान 70 जण जखमी झाले होते.

9) 13 जानेवारी 2022 रोजी पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे किमान 12 डबे रुळावरून घसरले होते, या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता तर 36 जण जखमी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com