Odisha Train Accident : निधी मिळाला, पण..; रेल्वेमार्गावर 'कवच' नसण्याचं धक्कादायक कारण आलं समोर

Odisha Train Accident
Odisha Train Accidentesakal

ओडिसाच्या बालासोर येथे झालेल्या अपघातानंर अँटी-कोलिजन सिस्टमवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इंडिया टु़डेच्या रिपोर्टनुसार, डेटानुसार दक्षिण पूर्व रेल्वे (SER)ला स्वेदीशी रुपात विकसित करण्यासाठी बजेटचे वाटप करण्यात आले होते. पण मागील तीन वर्षांपासून यातील एक रुपया देखील खर्च करण्यात आलेला नाही. महत्वाचे म्हणजे अपघात झालेलं बालासोर हे देखील याच एसईआर अंतर्गत येतं.

SER च्या पिंक बुक नुसार कमी घनता असलेल्या रेल्वे मार्गावर (1,563 rkm) कवचसाठी ४६८.९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र मार्च २०२२ पर्यंत यापैकी काहीही खर्च करण्यात आले नाही.

सरकारच्या बजेट डॉक्युमेंटनुसार २०२१-२२ मध्ये SRE साठी १६२.२९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. ही रक्कम ऑटोमॅटीक ब्लॉक सिग्नलिंग, सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल आणि हाय-डेंसिटी नेटवर्क रुट्सच्या बॅलेंस सेक्शनवर रेल्वे अपघात टाळण्यासाठीच्या यंत्रणेसाठी मंजूर करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत हा निधी वापरण्यात आला नाहीये.

Odisha Train Accident
Video Viral : टार्गेटवरून बॉसने कर्मचाऱ्यांना झापलं; HDFC बँकेने दाखवला थेट घरचा रस्ता

रेल्वे मंत्रालयाच्या सुत्रानुसार बजेट तसेच पडून आहे, कारण या क्षेत्रात आतापर्यंत सुरक्षा व्यवस्थेसाठी निवीदा काढण्यात आलेल्या नाहीये. या डेटाचं विश्लेषन २०२३-२४ साठीच्या सरकारच्या बजेट दस्तावेजांमधून करण्यात आलं आहे. यामुळे अँटी ट्रेन कोलिजन सिस्टीम इंस्टॉल करण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी माहिती दिली की, रेल्वे अपघाताचे मुख्य कारण आणि यासाठी जबाबदार असलेल्या लोकांची ओळख पटली आहे. तसेच त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि प्वाइंट मशीन प्रणाली यात झालेल्या बिघाडामुळे अपघात झाल्याची माहिती दिली होती. या दोन्ही रेल्वे प्रणाली रेल्वे सिग्नलसाठी महत्वाच्या असतात.

Odisha Train Accident
Ahmednagar : औरंगजेबाचे पोस्टर झळकावणाऱ्यांवर मोठी कारवाई! नेमकं काय घडलं?

रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं की या प्रणालींच्या सेटिंग्जमध्ये बदल करण्यात आला होता. हा कसा आणि का केला गेला याबद्दलचा खुलासा रिपोर्टमध्ये केा जाईल. तसेच यासाठी जबाबदार लोकांची ओळख पटली आहे, तसेच अपघाताची चौकशी पूर्ण झाली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या रिपोर्टमध्ये सर्व माहिती उघड होईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी ड्रायव्हरची चुक नसल्याचे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com