PM मोदी बालासोरमध्ये दाखल; भीषण ट्रेन अपघाताचा घेत आहेत आढावा : Odisha Train Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi_Odisha accident

Odisha Train Accident: PM मोदी बालासोरमध्ये दाखल; भीषण ट्रेन अपघाताचा घेत आहेत आढावा

बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या भीषण ट्रेन अपघाताचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरनं ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. सध्या अधिकाऱ्यांसह ते घटनेचा आढावा घेत आहेत. तसेच कटक रुग्णालयात जाऊन ते जखमींची चौकशी देखील करणार आहेत. (Odisha Train Accident PM Modi arrives in Balasore terrible train accident is being reviewed)

अपघाताची माहिती कळताच शुक्रवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं होतं. तसेच आपण रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या संपर्कात असून अपडेट घेत असल्याचं म्हटलं होतं. तसेच पंतप्रधान मदत निधीतून मृतांना २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदतही जाहीर केली होती. (Odisha Accident News)

दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी उद्या सकाळी आपण घटनास्थळी भेट देणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील शनिवारी सकाळी घटनास्थळाला भेट देत मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत जाहीर केली. तसेच घटनास्थळी जाऊन स्वतः परिस्थितीचा आढावा घेतला. (Marathi Tajya Batmya)