
Odisha Govt Employee Property : एक सामान्य सरकारी कर्मचारी किती कमवू शकतो? परिवन विभागातीतल मोटार वाहन निरीक्षक त्याच्या पगारात ४४ भूखंड, एक किलो सोने, दोन किलो चांदी आणि १.२५ कोटी रुपयांचा बँक बॅलन्स कशा कमावू शकतो? ओडिशातील बौद्ध जिल्ह्यात तैनात असलेल्या गोलप चंद्र हंसदा यांच्याकडे आढळलेल्या अफाट संपत्तीनंतर दक्षता विभाग या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे.