esakal | ऐकावं ते नवलच! हेल्मेट नाही म्हणून, ट्रक ड्रायव्हरला केला दंड
sakal

बोलून बातमी शोधा

odisa news.

ओडिसामधील प्रादेशिक परिवहन कार्यालयात एका ट्रक चालकाला एका नियम उल्लंखनाबद्दल 1000 रूपयांचा दंड भरावा लागला आहे. 

ऐकावं ते नवलच! हेल्मेट नाही म्हणून, ट्रक ड्रायव्हरला केला दंड

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

आरटीओ म्हणजेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाला तुम्ही एकदा तरी भेट दिलीच असेल मग ते लायसन्स काढायला असो वा तुमच्या गाडीचे परमिट कढायला असो. तिथे तुम्हाला 'गाडीची कागदपत्रे आणा', 'गाडी चालवता येते की नाही त्याची परिक्षा द्या' असं सांगितले असेल. पण ओडिसामधील प्रादेशिक परिवहन कार्यालयात एका ट्रक चालकाला एका नियम उल्लंखनाबद्दल 1000 रूपयांचा दंड भरावा लागला आहे. ओडिसामधील गंजम जिल्ह्यात हेल्मेट न घालता वाहन चालविल्याबद्दल ट्रक चालकाला एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. ट्रकमध्ये हेलमेट घालावा लागतो हा अजब नियम कोणालाच माहिती नव्हता.

प्रमोद कुमार स्वान असं या ट्रक चालकाचे नाव आहे. प्रमोदला त्याच्या ड्रायव्हिंग परमिटचे नुतनीकरण करायचे होते. त्यासाठी तो प्रादेशिक परिवहन कार्यालयात म्हणजेच आरटीओमध्ये गेला. त्या कार्यालयात तो तेथील अधिकाऱ्याकडे ड्रायव्हिंग परमिटबाबत चौकशी करत होता.त्यावेळी त्या आधिकाऱ्याने त्याला सांगितले की, त्याने ट्रक चालवताना हेल्मेट घातला नव्हता त्यामुळे त्याच्या नावावर 1000 रूपयांचा दंड बाकी आहे. प्रमोदने तेथील अधिकाऱ्यांकडे या नियमाबाबत चौकशी केली पण कोणीच त्याला उत्तर दिले नाही.

एलआयसीची मोठी घोषणा: आता पॉलिसीचा मॅच्युरिटी क्लेम कुठूनही करा 

शेवटी त्याला बळजबरी करून दंड भरण्यास सांगितले गेले. प्रमोदने मिडीयासोबत बोलताना सांगितले की, 'मी गेली 3 वर्ष ट्रक चालकाचे काम करत आहे. तसेच मी ट्रकमधून पाण्याचा पुरवठ्याचे देखील काम करतो. आरटीओमधील अधिकारी माला दंड मागू माझा मानसिक छळ करत आहेत. या दंडाचे ठोस कारण देखील ते मला देत नाहीत. सरकारने याबाबत कारवाई केली पाहिजे.'

प्रमोदसोबत झालेली घटना या आधीदेखील अनेक लोकांसोबत घडली आहे. 2020मध्ये उत्तर प्रदेशातील प्रशांत तिवारी या व्यक्तिला चार चाकीमध्ये हेल्मेक घातला नसल्याने त्याच्या फोनमध्ये ई-चलनद्वारे दंडाचा मेसेज आला.

loading image
go to top