esakal | सेल्फीने घेतला जीव! दुसऱ्याचा धक्का लागून नदीत कोसळली तरुणी; VIDEO VIRAL
sakal

बोलून बातमी शोधा

women fall down in river during cclick selfie

कुठेही फिरायला गेल्यावर सेल्फी काढण्याचं वेड प्रत्येकालाच आहे. पण अशावेळी लोक आपण कोणत्या ठिकाणी आहे, तिथं किती धोकादायक ठिकाणी आपण आहोत याकडे दुर्लक्ष करतात आणि अपघाताला निमंत्रण मिळतं.

सेल्फीने घेतला जीव! दुसऱ्याचा धक्का लागून नदीत कोसळली तरुणी; VIDEO VIRAL

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भुवनेश्वर - सध्या कुठेही फिरायला गेल्यावर सेल्फी काढण्याचं वेड प्रत्येकालाच आहे. पण अशावेळी लोक आपण कोणत्या ठिकाणी आहे, तिथं किती धोकादायक ठिकाणी आपण आहोत याकडे दुर्लक्ष करतात आणि अपघाताला निमंत्रण मिळतं. यात अनेकदा जीवालाही धोका निर्माण होतो. आताही अशीच एक घटना घडली आहे.

सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना तोल गेल्यानं तरुणी थेट नदीत पडली. ओडिसातील सुंदरगढ जिल्ह्यात असलेल्या ईब नदीवरील कोनाकुंड पिकनिक स्पॉटवर ही घटना घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अनुपमा प्रजापती असं तिचं नाव असून कुटुंबासोबत ती पिकनिकला गेली होती. तिच्यासोबत तिचा भावी वरसुद्धा होता. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की अनुपमासोबत दोन तरुण आणि एक तरुणी आहे. तिच्यापासून काही अंतरावर एक महिला उभी आहे. सेल्फी घेत असताना एक पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला तरुण तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी पुढे आला. तेव्हा त्याचा पाय घसरतो आणि धक्का अनुपमाला लागतो. त्यानंतर अनुपमा पडल्याचं दिसते. 

हे वाचा - पोराच्या जिद्दीला पाहून IAS म्हणाले; "हो कही भी आग, लेकिन आग जलनी चाहिये"

लोकांना काही समजण्याच्या आतच ती पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तिचा बराच शोध घेतल्यानंतर दोन दिवसांनी मृतदेह आढळला. सेल्फी घेत असताना आपण सुरक्षित ठिकाणी तर आहे की नाही हे न पाहिल्यानं अनुपमाला हकनाक जीव गमवावा लागला. 
 

loading image
go to top