AAP MLAs Allegations Against BJP: भाजपमध्ये सामील होण्यासाठी मिळाली तब्बल 'इतक्या' कोटींची ऑफर; AAP आमदाराने दाखल केला FIR

AAP MLAs Allegations Against BJP: भाजपमध्ये सामील होण्यासाठी आणि ऑफर देण्यासाठी फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव सेवक सिंह असून तो स्वत:ला भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगत असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
AAP MLAs Allegations Against BJP
AAP MLAs Allegations Against BJPEsakal

AAP MLAs Allegations Against BJP: देशात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच आरोप प्रत्यारोप, पक्षांतर यांना वेग आला आहे. या दरम्यान एका पक्षाच्या आमदाराने पोलिसांमध्ये एफआयआर दाखल करत भाजपमध्ये सामील होण्यासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा केला आहे.

पंजाबच्या लुधियाना दक्षिण येथील आम आदमी पक्षाच्या आमदाराने एफआयआर दाखल केला आहे. आमदार राजिंदरपाल कौर छिना यांनी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना पक्ष सोडण्यासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने (भाजप) देखील पोलिसांना या प्रकरणाचा बारकाईने तपास करण्याचे आवाहन केले आहे.(FIRs registered over AAP MLAs' allegations against BJP)

AAP MLAs Allegations Against BJP
Video: आसाममध्ये तुफान पाऊस; एअरपोर्टचं छत कोसळलं, विमानांचे मार्ग वळवले

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 'आप' सोडण्यासाठी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक आणि ५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. याशिवाय त्यांना खासदारकीचे तिकीटही देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. वृत्तात सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, छिना यांनी ऑफर देण्यासाठी आलेला फोन नंबर देखील पोलिसांना दिला आहे, जो 46 कोडचा म्हणजेच स्वीडनचा आहे.

या क्रमांकांवरून फोन आल्याचा आरोप छिना यांनी केला आहे. फोन करणाऱ्याचे नाव सेवक सिंह असून तो स्वत:ला भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगत असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. सिंग याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तो दिल्लीत असल्याचा दावा करत आहे. आपच्या आमदाराने हे आरोप अशावेळी केले आहेत जेव्हा पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या अटकेबाबत भाजपला सातत्याने कोंडीत पकडत आहेत. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

AAP MLAs Allegations Against BJP
Weather Update: राज्यात यलो अलर्ट; तर बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

अहवालानुसार, एफआयआरमध्ये 'तक्रारदाराला एक कॉल आला होता..., ज्यामध्ये कॉलरने स्वत:ची ओळख भाजपच्या दिल्ली कार्यालयातून सेवक सिंह म्हणून सांगितली. त्यानी तक्रारदाराला आप सोडून भाजपमध्ये येण्यासाठी ५ कोटी रुपयांची ऑफर दिली. तसेच तक्रारदाराला खासदारकीचे तिकीट किंवा केंद्र सरकारमध्ये कोणतेही मोठे पद देण्याचे आमिष दाखवले. तक्रारदाराची दिल्लीत भाजप नेत्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही त्यानी दिले होते'.

या प्रकरणाबाबत अतिरिक्त डीसीपी-2 देव सिंह म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. हा फोन कॉल स्वीडिश नंबर वापरून केला असावा, पण आत्ताच काही सांगता येणार नाही.

वृत्तपत्राशी बोलताना पंजाब भाजपचे प्रवक्ते जयबंस सिंह म्हणाले, 'आमच्या माहितीनुसार सेवक सिंह नावाचा कोणताही व्यक्ती आमच्या पक्षाशी संबंधित नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून एफआयआरमागील सत्य समोर आणावे, असे आवाहन आम्ही पोलिसांना करतो.

AAP MLAs Allegations Against BJP
PM Modi Spoke on Electoral Bond: इलेक्टोरल बॉण्डवर PM मोदी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, ज्यांनी थयथयाट केला त्यांना...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com