PM Modi Spoke on Electoral Bond: इलेक्टोरल बॉण्डवर PM मोदी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, ज्यांनी थयथयाट केला त्यांना...

PM Modi spoke on Electoral Bond : इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांची योजना सुप्रीम कोर्टानं नुकतीच घटनाबाह्य ठरवली.
PM Modi Spoke on Electoral Bond:
PM Modi Spoke on Electoral Bond:

PM Modi spoke on Electoral Bond Marathi News : इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांची योजना सुप्रीम कोर्टानं नुकतीच घटनाबाह्य ठरवली. त्यानंतर ज्या बँकेला हे रोखे वितरित करण्याचा अधिकार होता त्या स्टेट बँक ऑफ इंडियानं याची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टाच्या आदेशानंतर अखेर कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळाला? याची संपूर्ण माहिती देशासमोर आली.

आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. तसेच ज्यांनी या प्रकरणावरुन थयथयाट केला त्यांना याचा पश्चाताप होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. एका न्यूज चॅनेलला मुलाखत देताना पंतप्रधान बोलत होते. (PM Modi first time spoke on Electoral Bond scheme which was recently declared by supreme court as unconstitutional)

PM Modi Spoke on Electoral Bond:
LPG Price 1 April: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा! LPG सिलिंडर झाला स्वस्त

इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणावरामुळं भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. याला उत्तर देताना मोदी म्हणाले, इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणामुळं आमच्या सरकारला कोणताही फटका बसणार नाही. कुठलीही व्यवस्था परफेक्ट नसते तसेच येणाऱ्या काळात यामध्ये सुधारणा होतील. त्याचबरोबर मोदी असंही म्हणाले की, ज्यांनी या मुद्द्यावरुन थयथयाट केला तसेच त्यांना आपल्या या कृतीचा अभिमान वाटत होता, त्यांनाच पुढे याचा पश्चाताप होईल. (Latest Maharashtra News)

PM Modi Spoke on Electoral Bond:
April Fool's Day 2024 : 'त्या दिवशी माझं घर जळत होतं अन् लोकांना वाटलं मी त्यांना एप्रिल फुल करतेय' वाचा अभिनेत्री तनाजची आपबिती

मोदी पुढे म्हणाले, उलट या इलेक्टोरल बॉण्ड सिस्टिमुळं आणि आपल्या सरकारमुळंच या बॉण्डद्वारे ज्यांनी पैसे दिले आणि जे राजकीय पक्ष लाभार्थी ठरलेत ते समोर आले आहेत. आज जर याची पावती आपल्याला उपलब्ध असेल तर ते या बॉण्ड्समुळेच. 2014 पूर्वीच्या निवडणुकीसाठी निधीचे स्रोत आणि त्यांचे लाभार्थी कोण होते? याबद्दल कोणतीही एजन्सी सांगू शकते का? कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते त्यात काही उणीवा असू शकतात आणि त्या सुधारल्या जाऊ शकतात. (Marathi Tajya Batmya)

PM Modi Spoke on Electoral Bond:
Electric Vehicle खरेदीची सुवर्ण संधी! दुचाकीवर मिळणार 'इतकी' सबसिडी, जाणून घ्या नव्या योजनेविषयी सर्वकाही

तामिळनाडूत भाजपचा झेंडा रोवायच्या प्रयत्नात असलेल्या भाजपसाठी तामिळनाडू महत्वाचं राज्य असल्याचं सांगताना. आपण देशासाठी काम करतो आणि तामिळनाडू ही आपली मोठी ताकद आहे, असं मोदी म्हणाले.

तसेच आपण प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहता कामा नये असंही ते म्हणाले. जर मतांचीच आपल्याला काळजी असती तर ईशान्येकडील राज्यांसाठी आपण इतकं केलंच नसतं. आमच्या सरकारच्या मंत्र्यांनी या भागाला 150 हून अधिक वेळा भेट दिली आहे आणि आपण स्वतः इतर सर्व पंतप्रधानांपेक्षा जास्त वेळा तिथं गेलो आहेत, असंही मोदी या मुलाखती दरम्यान म्हणाले. (Latest Marathi News)

PM Modi Spoke on Electoral Bond:
MS Dhoni Video: तेच मैदान अन् तोच माही! धोनीने चौकार-षटकारांची बरसात करत 19 वर्षांपूर्वीच्या आठवणी केल्या ताज्या

तमिळ भाषेच्या राजकारणावर केलं भाष्य

भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार हे समाजातील विविध घटकांना जोडतं आणि लोकांच्या आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतं, त्यामुळं तामिळनाडूमध्ये भाजपला मिळणारी मतं ही द्रमुकविरोधी नसून भाजप समर्थक असतील, असंही मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान, तमिळ भाषेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य करताना मोदी म्हणाले, राज्याच्या पाककृतीचं जागतिकीकरण झालं आहे, त्याप्रमाणं इथली भाषा देखील जागतीक स्तरावर गेली पाहिजे. तामिळ भाषेचे राजकारणीकरण केवळ तामिळनाडूसाठीच नाही तर देशासाठीही हानिकारक आहे, असा इशाराही यावेळी मोदींनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com