सरकारी बाबूची २७ वर्षे नोकरी; ३ टोलेजंग इमारती, २ आलिशान बंगले, १३ प्लॉट; २ कोटींची रोकड, सोने-चांदी अन् जमिनीची मोजणी बाकी

विजिलन्स डिपार्टमेंटच्या पथकाने केलेल्या कारवाईत अधिकाऱ्याकडे मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता असल्याचं आढळून आलंय. ओडिशात वेगवेगळ्या ठिकाणी घर, जमीनही त्याच्या नावे आहे.
Officer's Crores Worth Assets Shock Investigators

Officer's Crores Worth Assets Shock Investigators

Esakal

Updated on

ओडिशात एका सरकारी इंजिनिअरकडे कोट्यवधींची रोकड सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विजिलन्स डिपार्टमेंटच्या पथकाने केलेल्या कारवाईत अधिकाऱ्याकडे मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता असल्याचं आढळून आलंय. ओडिशात वेगवेगळ्या ठिकाणी घर, जमीनही त्याच्या नावे आहे. वैकुंठनाथ बेहरा असं त्याचं नाव असून कंधमाल जिल्ह्यातील बालीगुडा इथं एकीकृत जनजातीय विकास एजन्सीत तो सहाय्यक म्हणून काम करतो. अधिकृत उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणी तक्रारीनंतर छापे टाकण्यात आले. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com