पोट भरण्यासाठी रस्त्यावर वाजवतोय व्हायोलिन; वृद्धाचा VIDEO VIRAL

पोट भरण्यासाठी रस्त्यावर वाजवतोय व्हायोलिन; वृद्धाचा VIDEO VIRAL

कोलकाता - सोशल मीडियावर सध्या एका वृद्धाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये वृद्ध रस्त्यावर व्हायोलिन वाजवत आहे. त्याच्या या व्हिडिओचं कौतुक युजर्स करत आहेत.एका ट्विटर युजरने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यानं सांगितलं की, कोलकात्यात हा वृद्ध कलाकार त्याची कला दाखवत आहे. तसंच हेसुद्धा सांगितलं की, लॉकडाऊनच्या काळात तो व्हायोलिन वाजवून लोकांचे मनोरंजन करत आहे.

रस्त्याच्याशेजारी वृद्ध व्हायोलिन वाजवत आहे. त्यावर तो अजीब दास्ताँ है यह आणि दीवाना हुआ बादल यांसारखी गाणी वाजवत आहे. त्याच्या शेजारी एक वृद्ध महिलासुद्धा उभा आहे. रात्रीच्या वेळी व्हायलिन वाजवत असून लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर कमी अधिक अशी वाहतूक होतानाही दिसत आहे.

पोट भरण्यासाठी रस्त्यावर वाजवतोय व्हायोलिन; वृद्धाचा VIDEO VIRAL
डिजिटल इंडियातलं गाव पण नेटवर्कच नाही; टेकडीवर भरते शाळा
पोट भरण्यासाठी रस्त्यावर वाजवतोय व्हायोलिन; वृद्धाचा VIDEO VIRAL
हद्दच झाली! किती रुग्णांचा मृत्यू होतो पाहण्यासाठी ऑक्सिजन केला बंद

ट्विटर युजरनं व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, कोलकात्यातील वृद्धाचं टॅलेंट पाहा, कोरोना काळात हा कलाकार संघर्ष करत आहे. त्याच्या कलेच्या माध्यमातून दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्याचं नाव भोगोबन माली असं असून कोलकात्यातील गिरीश पार्कजवळ राहतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com