कायद्याच्या शिक्षणासाठी आजींची न्यायालयात धाव 

पीटीआय
Monday, 14 September 2020

विधी महाविद्यालयात प्रवेश नाकारल्यानंतर एका आजींनी सर्वोच्च न्यायालयाची दारे ठोठावत बार कांउन्सिल ऑफ इंडियाच्या वयासंदर्भातील नियमाविरोधात आव्हान याचिका दाखल केली आहे. 

नवी दिल्ली - कायद्याचे शिक्षण घेण्याची प्रबळ इच्छा असली तरी वयामुळे विधी महाविद्यालयात प्रवेश नाकारल्यानंतर एका आजींनी सर्वोच्च न्यायालयाची दारे ठोठावत बार कांउन्सिल ऑफ इंडियाच्या (बीसीआय) वयासंदर्भातील नियमाविरोधात आव्हान याचिका दाखल केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तर प्रदेशमधील साहिबाबाद येथे राहणाऱ्या राजकुमारी त्यागी (वय ७७) ही याचिका दाखल केली आहे. पतीच्या निधनानंतर मालमत्ता सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यातून त्यांना कायदे विषयात रस निर्माण झाला. पतीचे मृत्युपत्र किंवा नोंद ओळख अशी कायदेशीर गुंतागुंतीची कामे त्यांनी वकिलाचा मदत न घेता एकटीने केली, असल्याचा दावा याचिकेत केला आहे. एल.एल.बी या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी त्यागी विधी महाविद्यालयात अर्ज भरला होता. पण वयाचे कारण देऊन त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. ‘बीसीआय’च्या नियमानुसार एल.एल.बीच्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी वयाची अट २० वर्षांपर्यंत असून तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ३० वर्षे वयोमर्यादा आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रवेशाच्या नव्या नियमामुळे घटनेतील कायद्याआधी समानता आणि कोणताही व्यवसाय, व्यापार करण्यास परवानगी देण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old woman moves SC against BCI age criterion to study law