
ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला भारतीय सैन्यात मोठी जबाबदारी मिळाली आहे. नीरज चोप्राला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली आहे. नीरज चोप्रा हा जगातील सर्वोत्तम भालाफेकपटूंपैकी एक आहे. नीरजने टोकियो ऑलिंपिक २०२१ मध्ये भारतासाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. आता त्याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची पदवी देण्यात आली आहे.