लोकसभा अध्यक्षांनी खासदारांच्या अनुपस्थितीची घेतली गंभीर दखल

Om Birla Speaker of the LokSabha
Om Birla Speaker of the LokSabhaOm Birla Speaker of the LokSabha

नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी (ता. १४) चर्चेदरम्यान संबंधित मंत्र्यांच्या उत्तराची वाट न पाहता सदस्यांनी विधान करून सभागृह सोडल्याचा बाब गंभीरपणे घेतली आहे. अशा सदस्यांना पक्षांनी सभागृहात चर्चेदरम्यान उभे करू नये, असेही बजावले आहे.

२०२२-२३ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन उत्तर देत होत्या. सभागृहात उपस्थित नसलेल्या काँग्रेस सदस्याने उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देत होत्या. ते नमूद करून बिर्ला यांनी ही टिप्पणी केली. मंत्र्यांनी या मुद्द्याला उत्तर देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. खासदार उत्तरादरम्यान सभागृहात राहत नाहीत. ही गंभीर चिंतेची बाब आहे. त्यांना अशावेळी उत्तर देऊ नका, असेही ते म्हणाले.

Om Birla Speaker of the LokSabha
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल आंबियाची हत्या; झाडल्या गोळ्या

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या उत्तरानंतर, सभागृहाने २०२२-२३ साठी जम्मू आणि काश्मीरसाठी अनुदानाच्या मागण्या, २०२१-२२ साठी अनुदानाच्या पुरवणी मागण्या, अनुदानाच्या पुरवणी मागण्या (२०२१-२२ साठी तिसरी आणि अंतिम तुकडी), २०१८-१९ साठी आणि संबंधित विनियोग बिले, जादा अनुदानाच्या मागण्या मंजूर केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com