भारताचे ओमानबरोबर राजनैतिक संबंध टिपू सुलतान पासून सुरु झालेत...

ओमानमध्ये ६ लाखांपेक्षा अधिक भारतीय राहतात
Tipu sultan
Tipu sultan E sakal

भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि पार्टी मिडीया सेलचे प्रमुख नवीन जिंदाल, यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर भाजपाने या दोघांना पदावरुन हटवलंय. तसंच त्यांचं पक्ष सदस्यत्व देखील रद्द केलंय. भाजपा नेत्यांच्या या विधानानंतर इस्लामिक राष्ट्रांनी भारताने माफी मागावी अशी मागणी केली. ओमान, ईराण, कुवेत , बहरिन आणि सौदी अरेबिया या आखाती राष्ट्रांनी या संदर्भात निषेध व्यक्त केला होता. यानंतर भाजपने राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा हिला पक्षातून काढून टाकले आणि त्याचबरोबर दिल्ली मिडीया सेल प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांच्याविरोधातही पक्षाने कारवाई करत, पदावरुन हकालपट्टी केलीय. तसंच भाजपाने या नेत्यांचे विचार हे देशाचे विचार नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. आखाती देशांमध्ये भारताचे ओमानबरोबरील संबंध अतिशय जवळचे मानले जातात. ( India has very good international relation with Oman)

ओमान आणि भारताचे परराष्ट्र संबंध नेहमीच चांगले राहिलेत. एवढंच नाही तर या देशात मोठ्या प्रमाणात प्रवासी भारतीय राहतात. या देशाचा एक चतृर्थांश भाग हा भारतीयांनी व्यापला आहे. सुमारे ६ लाखांपेक्षा अधिक भारतीय ओमानमध्ये राहतात. ओमान नेहमीच भारताच्या बाजूने उभा राहिलाय. इतकंच नाही तर पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात अनेक इस्लामिक राष्ट्र हे पाकिस्तानकडे झुकले होते. मात्र ओमान भारताबरोबर उभा होता.

ओमानच्या सुलतानाने जपलं मंदिर केला होता महामृत्यूंजयचा जप -

ओमानचे शेवटचे सुलतान कबूस बिन सईद अल् सईद यांनी भारतीय रहिवाशांच्या भावनांचा आदर राखत मस्कत मध्ये हिंदू मंदिराची फक्त देखरेखच केली नव्हती तर त्यांनी भारतीय पुजाऱ्यांना आमंत्रित केलं होतं. यावेळेस महामृत्यूंजयचा जप आणि विष्णू यज्ञ देखील झाला होता. महादेवाचं हे मंदिर २५० वर्ष जुनं आहे.

भारताशी ओमानचे नेहमीच मित्रत्वाचे संबंध राहिलेत. मात्र भाजपा नेत्यांच्या वक्तव्यानंतर ओमानमध्ये नागरिक संतप्त असून, भारतीय मालावर बहिष्कार टाकण्यात आलाय. २०१८ मध्ये पंतप्रधान मोदीनी ओमानला भेट दिली होती, तेव्हा या मंदिरातही ते गेले होते. भारत आणि ओमानमध्ये मित्रत्वाचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. भारताची मस्कतमध्ये एम्बसी देखील आहे.

१९५५ मध्ये मस्कतला भारतीय दुतावास ऊभारण्यात आलं. ओमानने १९७१ साली दिल्लीत आपलं दुतावास उभारलं होतं. एवढंच नाही तर व्यापारीदृष्टया महत्वाचा Great Conclave भारताने उभारलंय. ओमानमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नोकरी आणि उद्योगांसाठी वास्तव्यास आहेत. तर भारत हा ओमानसाठी महत्वाचा व्यापारी केंद्र आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावं यासाठी ओमानचा देखील भारताला पाठिंबा आहे.

टिपू सुलतानने पहिल्यांदा ओमानमध्ये आपलं शिष्टमंडळ पाठवलं-

भारताशी ओमानचे व्यापारी संबंध अनेक शतकांपूर्वीचे असल्याचे पुरावे अनेकदा सापडलेत. गुजरात आणि कर्नाटकच्या मलबार भागात ओमानचे व्यापारी संबंध होते. राजा टिपु सुलतानने त्यांच्या काळात एक शिष्टमंडळ देखील ओमानमध्ये पाठवलं होतं. त्याचबरोबर ओमान आणि भारताचे व्यापारी संबंध अनेक शतकांपासून असल्याचे पुरावे ओमानमध्ये झालेल्या उत्खननात अनेकदा समोर आले आहेत.

Tipu sultan
१९९८ च्या राज्यसभा निवडणुकीनंतर पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली ...

भारताच्या बाजूने उभा राहणारा हक्काचा मित्र अशी ओमानची ओळख-

आखाती देशांपैकी भारताच्या सुरक्षा दलांशी संबंध असलेला ओमान हा पहिलाच देश होता. अनेकदा इतर आखाती राष्ट्रांचा ओढा पाकिस्तानकडे असतो. मात्र ओमान भारतीय नौदलाशी नेहमीच सुरक्षा कावयतींमध्ये सहभाग घेत आलाय. २००६ पासून भारतीय नौदल आणि हवाई दल ओमानबरोबर सुरक्षा कवायतींमध्ये सहभागी झालेले आहेत. ओमानवर अनेक वर्ष सुलतान कबुस बिन सैद अल सैद सगळ्यात जास्त काल हुकमत गाजवली. भारत आणि भारतीयांबद्दल त्यांना आत्मीयता होती. त्यांच्या काळातच भारत आणि ओमानचे संबंध अधिक चांगले झाले. २०२० साली वयाच्या ७९ व्या वर्षी त्याचं निधन झालं. तेव्हा भारताने एका दिवसाचा दुखवटा पाळला होता.

ओमानच्या राजाचं झालं होतं भारतात शिक्षण-

२०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना ओमानच्या दौऱ्यावर गेले असता भेटले होते. सुलतान कबुस बिन सैद अल सैद भारताशी आत्मीयता असल्याचं कारण म्हणजे कबुस बिन सैद अल सैद यांचं शिक्षण पुण्यात झालं होतं. तेव्हा भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती शंकर द्याळ शर्मा त्यांना शिकवायला होते. पुढे कबुस बिन सईद सुलतान बनले तर शंकर द्याळ शर्मा भारताचे राष्ट्रपती झाले. ते जेव्हा ओमानच्या दौऱ्यावर गेले तेव्हा कबुस सईद त्यांच्या स्वागताला गेले आणि एअरपोर्टपासून राडवाड्यापर्यंत त्यांनी स्वत: गाडी चालवली होती. तसंच त्यांच्या वडिलांनीही राजस्थानमध्ये अजमेरमधून शिक्षण घेतलं होतं.

ओमानने भारताला दिला 'डुकम' बंदराचा सैन्यदलाच्या वापराला परवानगी-

हिंदी महासागर आणि अरेबियन समुद्रात चीन आपले पाय पसरवत आहे. चीनला पाकिस्तानातील ग्वादर बंदराचा वापर कऱण्यास मिळालाय. त्यानंतर भारताने पुढचं पाऊल उचलत २०१८ च्या ओमान दौऱ्यात मोदींनी डुकम बंदराची भारतीय संरक्षण दलाच्या वापराला परवानगी मिळवलीय. तसंच इराणच्या चाबहार बंदराची परवानगी देखील भारताने मिळवलेली आहे. डुकम बंदर संरक्षण दलाच्या वापरासाठी महत्वाचं ठरणार असून ही चीनवर मात आहे.ओमानच्या सहकार्यामुळे भारताने हिंदी महासागरातलं आणि अरबी समुद्रातलं सामर्थ्य नक्कीच वाढलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com