काश्मिर फाईल्स निव्वळ खोटेपणा, सगळं चुकीचं - ओमर अब्दुल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farook Abdull

काश्मिर फाईल्स निव्वळ खोटेपणा, सगळं चुकीचं - ओमर अब्दुल्ला

The Kashmir Files : देशात सध्या काश्मिर फाईल्स या चित्रपटाची मोठी चर्चा सुरु आहे. चित्रपटावरून दोन गट निर्माण झाले असून, अनेकांनी या चित्रपटाला विरोध केला आहे, तर अनेकांनी हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या वेदना जगाला सांगत असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

'"द काश्मिर फाइल्स' चित्रपटात अनेक खोट्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्यावेळी फारुख अब्दुल्ला हे जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री नव्हते, तव्हा राष्ट्रपती राजवट होती. देशात व्हीपी सिंग यांचं सरकार होतं आणि त्याला भाजपचा पाठिंबा होता." असं ओमर अब्दुल्ला म्हणाले आहे.

दरम्यान, एकीकडं देशभरातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, दुसरीकडं अनेकांकडून चित्रपटावर जोरदार टीका देखील केली जात आहे. सोशल मीडियावर देखील अशाच प्रकारचे दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Director Vivek Agnihotri) यांना 'Y' दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. अग्निहोत्रींच्या सुरक्षेसाठी चार ते पाच सशस्त्र कमांडो तैनात करण्यात आले असून त्यांचा मुक्काम आणि भारतभर प्रवासादरम्यान CRPF कडून त्यांचं रक्षण केलं जाणार आहे.

टॅग्स :Omar Abdullah