
Boycott Bachchan Pandy: 'मुस्लीम व्यक्ति खलनायक का नसतो?'
Bollywood News: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जातो. त्याची स्टाईल आणि लूक यामुळे चाहते (Bollywood Actor) त्याच्यावर फिदा असतात. अक्षयचा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असणारा बच्चन पांडे(Bachchan Pandey) नावाचा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. कोरोनानंतर हा अक्षयचा दुसरा चित्रपट आहे. त्यापूर्वी त्यानं लक्ष्मी बॉम्ब, बेल बॉटम नावाचे चित्रपट केले होते. त्याला काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यावरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली होती. लक्ष्मी बॉम्ब हा तर त्याच्या नावामुळे चर्चेत आला होता. आगामी त्याचा पृथ्वीराज चौहान देखील वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. त्याच्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.
अक्षय हा त्याच्या बच्चन पांडे मुळे चर्चेत आला आहे. त्यावर बंदीची मागणी चाहत्यांनी केली आहे. सध्या सोशल मीडियावर बच्चन पांडे बॉयकॉट नावाचा ट्रेंड सुरु आहे. तो नेमका काय आहे हे आपण पाहणार आहोत. बॉलीवूडनं जाणीवपूर्वक ब्राम्हण आणि हिंदूंचे नकारात्मक चित्रण केल्यानं त्या चित्रपटावर बंदीची मागणी करण्याक आली आहे. दोन वर्षांपासून चाहते अक्षयच्या बच्चन पांडेची वाट पाहत होते. मात्र जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यानंतर काही वेळातच त्याच्या विरोधात ट्रेंड( #BoycottBachchhanPaandey)सुरु झाला आहे.
अक्षयच्या या चित्रपटामध्ये क्रिती सेनन, अर्शद वारसी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आयएमडीबीनं तर बच्चन पांडेला 2.9 एवढीच रेटिंग दिली आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाची तुलना द काश्मिर फाईल्सशी करताना दिसत आहे. त्यामुळे बच्चन पांडेला मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसतोय. साजिद नाडियावालानं बाहुबलीच्या व्हिलनची कॉपी या चित्रपटामध्ये केली आहे. हिंदु ब्राम्हणांना जाणीवपूर्वक नकारात्मक रोलमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घाला. अशा प्रकारचा ट्रेंड आता सोशल मीडियावर सुरु झाला आहे. मुस्लिम दिग्दर्शक एखाद्या मुस्लिम व्यक्तिला व्हिलन म्हणून दाखवतात का? मग हिंदूंच्याच बाबत असे का होते? असा प्रश्न नेटकऱ्यांनी अक्षयाल विचारला आहे.