
नवी दिल्ली : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व, अजेंडा आणि भविष्यात एकत्र राहायचे की नाही याविषयी कोणतीही स्पष्टता नाही. ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरती असेल तर ती गुंडाळण्यात यावी, असे मत आज जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.