''उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांचा विवाह शरिया कायद्यानुसार बेकायदेशीर'', 'ऑल इंडिया मुस्लिम जमात'चा आक्षेप

Omar Abdullah & Nidhi Razdan Marriage: आपल्या भूमिकेचे समर्थन करताना मौलाना रजवी यांनी सांगितले की, इस्लाममध्ये विवाहाबाबत स्पष्ट नियम आणि अटी ठरवून दिलेल्या आहेत. जर दोघांपैकी एकही व्यक्ती मुस्लिम नसेल, तर असा विवाह कायदेशीर किंवा वैध मानला जात नाही.
''उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांचा विवाह शरिया कायद्यानुसार बेकायदेशीर'', 'ऑल इंडिया मुस्लिम जमात'चा आक्षेप
Updated on: 

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ज्येष्ठ पत्रकार निधी राजदान यांच्याशी विवाह केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत यावरून एक नवा धार्मिक वाद निर्माण झाला आहे. 'ऑल इंडिया मुस्लिम जमात'चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी शरीयत आणि इस्लामिक तत्त्वांचा दाखला देत हा विवाह बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय.

Loading content, please wait...