esakal | IPLमधील चिनी स्पॉन्सरशिपवर ओमर अब्दुला म्हणाले; त्या मूर्ख लोकांबद्दल वाईट वाटतं!
sakal

बोलून बातमी शोधा

 omar abdullah ,ipl

भारत-चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक घटनेनंतर देशभरात चीन विरोधात संतापाची लाट उसळली. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा प्रकारही पाहायला मिळाला.

IPLमधील चिनी स्पॉन्सरशिपवर ओमर अब्दुला म्हणाले; त्या मूर्ख लोकांबद्दल वाईट वाटतं!

sakal_logo
By
सुशांत जाधव

श्रीनगर: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) चे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेता ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी   आयपीएलच्या चिनी स्पॉन्सर्सशिपवरुन बीसीसीआयवर निशाणा साधलाय. देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु आहे. मात्र आयपीएलमधील सर्व स्पॉन्सर्संना रिटेन करण्यात आले आहे. यात चिनी कंपन्यांच्या स्पॉन्सर्संचा देखील समावेश आहे. लडाख परिसरातील चीनच्या कुरापतीनंतर त्यांचे ही पहिली प्रतिक्रिया आहे.

Sushant Singh rajput Death Case: बिहार अन् मुंबई पोलिस आमने-सामने, काय आहे नेमकं प्रकरण

गलवान खोऱ्यात 20 जवानांना हुतात्मा पत्कारावे लागले होते. भारत-चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक घटनेनंतर देशभरात चीन विरोधात संतापाची लाट उसळली. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा प्रकारही पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर ओमर अब्दुला यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, लोक चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेत सहभागी होत असताना 'चिनी मोबाईल निर्माता कंपनीची आयपीएलमधील टायटल स्पॉन्सर्सशिप कायम ठेवण्यात आली आहे.  चिनी गुंतवणूक, प्रायोजन आणि जाहिरात याबाबत आपण संभ्रमित आहोत, याचे आश्चर्य वाटत नाही. चीन विरोधातील भूमिकेसाठी ज्यांनी त्यांच्या कंपनीचा टीव्ही बाल्कनीतून खाली फेकला त्या मूर्ख लोकांचे वाईट वाटते., असा उल्लेखही ओमर अब्दुला यांनी केलाय.

IPL 2020: 53 दिवसांची स्पर्धा; पहिल्यांदाच 'वर्किंग डे'ला रंगणार 'फायनल'

नुकतीच बीसीसीआयच्या आयपीएलगव्हर्निंग काउंसिलची बैठक पार पडली. या बैठकीत पूर्वीचे सर्व करार कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यात चिनी मोबाईल कंपनी विवोचाही समावेश आहे. बीसीसीआयच्या आयपीएलशी संलग्नित गव्हर्निंग काउंसिलने अन्य कंपन्यांसोबतच चिनी कंपनीसोबतचा करार कायम राहणार अल्याचे स्पष्ट केले आहे.