esakal | Sushant Singh rajput Death Case: बिहार अन् मुंबई पोलिस आमने-सामने, काय आहे नेमकं प्रकरण
sakal

बोलून बातमी शोधा

sushant singh rajput death case

मुंबई पोलिसांनी या प्रकरणात 35 हून अधिक जणांची चौकशी केल्यानंतरही त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणात आता बिहार पोलिस (Bihar Police) आणि मुंबई पोलिस  (Mumbai Police) आमने-सामने आल्याचे दिसते आहे.

Sushant Singh rajput Death Case: बिहार अन् मुंबई पोलिस आमने-सामने, काय आहे नेमकं प्रकरण

sakal_logo
By
सुशांत जाधव

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला (Sushant Singh Rajput Case) एक वेगळ वळण लागल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात 35 हून अधिक जणांची चौकशी केल्यानंतरही त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणात आता बिहार पोलिस (Bihar Police) आणि मुंबई पोलिस  (Mumbai Police) आमने-सामने आल्याचे दिसते आहे. याप्रकरणाच्या तपासासाठी बिहार पोलिसांतील तपास अधिकारी विनय तिवारी (एसीपी, पटना) रविवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले होते. मुंबईत दाखल होताच बीएमसीने त्यांना क्वारंटाईन केले. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी या प्रकरणात तातडीची बैठक बोलवल्याचे वृत्त आहे.

बिहारहून आले तपासासाठी... आणि मुंबईत झाले क्वांरटाईन

सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत दाखल झालेल्या विनय तिवारी यांनी बीएमसीने क्वारंटाईन केल्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. कोणत्याही प्रकारचे नमुने तपासणीसाठी न घेता 14 दिवस क्वारंटाइन करण्यात आल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. विनय तिवारी म्हणाले की, मुंबईतील एका गेस्ट हाऊसमध्ये मला 14 दिवसांसाठी क्वारंटाऊन करण्यात आले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुंबईमध्ये असलेल्या तपास टीमच्या संपर्कात आहे. महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार एअरपोर्टवरुनच मला क्वारंटाईन करण्यात आले. मी ड्यूटीवर असूनही हा प्रकार घडला असून यामुळे चौकशीची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात दाखल केली FIR

सुशांतचे वडील  केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती सहित अन्य सहा जणांच्या विरोधात मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्यांना यासंदर्भात पटना पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर बिहार पोलिसांचे चार सदस्यीय टीम चौकशीसाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे. विनय तिवारी या टीमचे नेतृत्व करत आहेत. त्यांना विनाकारण क्वारंटाइन करण्यात आल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला आहे. बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांड्ये यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. आयपीएस अधिकारी विनय तिवारी कामाच्या निमित्ताने पटनाहून बिहारला दाखल झाले आहेत. मात्र त्यांना क्वारंटाइन करुन चौकशीत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप बिहारच्या पोलिस महासंचालकांनी केलाय. विनंतीनंतरही त्यांना  आयपीएस मेसमध्ये न ठेवता गोरेगांवच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. 

loading image