
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या सीमेवर होणारा गोळीबार पाकिस्तानने थांबवावा. नाही तर त्यांचे मोठे नुकसान होईल, असा इशारा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी दिला. जम्मू शहरावर काल झालेले हवाई हल्ले हे १९७१च्या युद्धानंतरचे सर्वांत गंभीर हल्ल्यांपैकी एक आहे, असे ते म्हणाले.