Omicron मुळे लहान मुलांमध्ये हृदयविकार वाढण्याची शक्यता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Increased risk of heart disease in young children

Omicron मुळे लहान मुलांमध्ये हृदयविकार वाढण्याची शक्यता!

कोरोनामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अजूनही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. असे असतानाही त्याचे विविध रूप सतत पुढे येत आहे. यामुळे नागरिकांच्या मनात असलेली भीती कायम आहे. आता अभ्यासातून कोरोनाचा प्रकार ओमिकॉनमुळे (Omicron) लहान मुलांना हृदयविकाराच झटका (heart disease) येण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. कोलोरॅडो विद्यापीठ, नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि यूएसमधील स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे. (Increased risk of heart disease in young children)

कोरोना विषाणूचा प्रकार ओमिक्रॉनमुळे मुलांमध्ये अप्पर एअरवे इन्फेक्शन होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. यामुळे लहान मुलांना हृदयविकाराचा झटका आणि इतर गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. हा निष्कर्ष नॅशनल कोविड कोहॉर्ट कोलॅबोरेटिव्हच्या डेटाचे वाचन आणि विश्लेषण करून जाहीर करण्यात आला आहे. यासाठी कोरोनामुळे रुग्णालयात दाखल केलेल्या १९ वर्षांखालील १८,८४९ मुलांवर लक्ष ठेवण्यात आले. हा अहवाल मागच्या आठवड्यात JAMA Pediatrics या जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता.

हेही वाचा: फिश प्रोसेसिंग युनिटमध्ये अपघात; ५ मजुरांचा गुदमरून मृत्यू

कोरोनाचा प्रकार ओमिक्रॉनने (Omicron) लहान मुलांच्या अप्पर एअरवे इन्फेक्शनला नुकसान पोहोचवले. जेव्हा ओमिक्रॉनचे यूएसमध्ये रुग्ण वाढले तेव्हा मुलांमध्ये अप्पर एअरवे इन्फेक्शनची प्रकरणे वाढली की नाही हे तपासण्यासाठी संशोधकांनी अभ्यास केला. एकंदरीत कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या २१.१ टक्के मुलांना मुलांमध्ये अप्पर एअरवे इन्फेक्शनचा गंभीर आजार झाल्याचे लक्षात आले.

रुग्णांना इंट्यूबेशनची आवश्यक

या रुग्णांना इंट्यूबेशन आवश्यक होती. यामध्ये श्वासोच्छवासास मदत करण्यासाठी फुफ्फुसात एक ट्यूब घातली जाते. गंभीर मुलांमध्ये अप्पर एअरवे इन्फेक्शन असलेल्या मुलांना हृदयविकाराचा धोका असतो. त्यांना नेब्युलायझ्ड रेसेमिक एपिनेफ्रिन, हेलियम-ऑक्सिजन मिश्रण आणि इंट्यूबेशनसह विशेषत: अतिदक्षता विभागात पुरविलेल्या उपचारांची आवश्यकता असू शकते, असेही अभ्यासात म्हटले आहे.

हेही वाचा: भरदिवसा लुटले १ कोटी; डोळ्यात मिरची पावडर टाकून आरोपी फरार

नेब्युलाइज्ड रेसेमिक एपिनेफ्रिन

नेब्युलाइज्ड रेसेमिक एपिनेफ्रिन सामान्यत: मध्यम ते गंभीर श्वसनाचा त्रास (heart disease) असलेल्या रुग्णांना देण्यात येते. SARS-CoV-2 अप्पर एअरवे इन्फेक्शनचा दर फारसा जास्त नसला तरी हा नवीन क्लिनिकल फेनोटाइप आणि तीव्र वरच्या श्वासमार्गात अडथळा येण्याची शक्यता समजून घेतल्यास उपचारात्मक निर्णय घेण्यास मदत करू शकते, असे बालरोगतज्ञ सांगतात.

वारंवारता कमी लेखली जाऊ शकते

ओमिक्रॉन (Omicron) फुफ्फुसाच्या (heart disease) पेशींमध्ये कमी कार्यक्षमतेने आणि वायुवाहक वायुमार्गांमध्ये अधिक कार्यक्षमतेने प्रतिकृती बनवते. संशोधकांनी या विश्लेषणाच्या काही मर्यादा मान्य केल्या. ज्यामध्ये अजूनही रुग्णालयात दाखल असलेल्या मुलांचे अभ्यासात प्रतिनिधित्व केले गेले नाही. ओमिक्रोन कालावधीत आढळलेल्या गंभीर आजाराची वारंवारता कमी लेखली जाऊ शकते, असेही संशोधकांनी नमूद केले आहे.

Web Title: Omicron Increased Risk Of Heart Disease In Young Children Practice Coronavirus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top