भरदिवसा लुटले १ कोटी; डोळ्यात मिरची पावडर टाकून आरोपी फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

भरदिवसा लुटले १ कोटी; डोळ्यात मिरची पावडर टाकून आरोपी फरार

राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये कॅश व्हॅनमधून एक कोटीचा ऐवज लुटल्याची घटना समोर आली आहे. चार ते पाच सशस्त्र हल्लेखोरांनी ही घटना घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी आधी कॅश व्हॅनचा चालक आणि कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. यानंतर पिस्तुलाच्या जोरावर हा प्रकार घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनांचे क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न (theft) पोलिस करीत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. अर्धा डझनहून अधिक पोलिस पथकांनी या प्रकरणाच्या तपासासह आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: फिश प्रोसेसिंग युनिटमध्ये अपघात; ५ मजुरांचा गुदमरून मृत्यू

एसएनआयव्ही कंपनीचे तीन कर्मचारी सकाळी कॅश व्हॅनसह संकलनासाठी निघाले होते. विविध ठिकाणांहून रोख रक्कम जमा केल्यानंतर दुपारी सेक्टर-५३ येथील एचडीएफसी बँकेत जमा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. सोमवारी दिल्ली विमानतळ आणि हॉटेलमधून रोख रक्कम घेऊन ते गुरुग्रामच्या सेक्टर-३४ येथील इन्फोसिटीमध्ये पोहोचले.

तेथून पैसे घेऊन सुभाष चौकात असलेल्या मारुती कंपनीची एजन्सी गाठली. कलेक्शन व्हॅन रस्त्यावर उभी होती. तेथून एजन्सीमध्ये एक कर्मचारी कॅश घेण्यासाठी गेला. तर दोन कर्मचारी व्हॅनमध्ये बसून होते. याचवेळी तीन ते चार चोरटे आले आणि कलेक्शन व्हॅनमध्ये मागे बसलेले व्हॅन चालक रणजीत आणि विपिन यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून बंदुकीच्या जोरावर एक कोटी लुटले. कलेक्शन व्हॅनमध्ये बसलेल्या कर्मचाऱ्यांना काही समजेपर्यंत चोरटे घटनास्थळावरून पळून गेले.

Web Title: Theft Delhi Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime Newsdelhi