ओमिक्रॉन - एकही राज्य वाचणार नाही; कोविड ट्रॅकर तयार करणाऱ्या प्रोफेसरचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'Omicron : एकही राज्य वाचणार नाही, तीव्र लाटेचा सामना करावा लागणार'

ब्रिटनमधील परिस्थिती पाहता भारतात तो किती वेगाने पसरू शकतो याचा अंदाज बांधता येईल असंही कट्टुमन यांनी म्हटलं आहे.

'Omicron : एकही राज्य वाचणार नाही, तीव्र लाटेचा सामना करावा लागणार'

कोरोनाचा (Corona) वेगाने पसरणारा ओमिक्रॉन व्हेरिअंट (Omicron Variant) चिंतेचं कारण ठरण्याची शक्यता आहे. भारतासाठी (India) ही डोकेदुखी ठरू शकतो कारण देशाची लोकसंख्या १४० कोटी इतकी आहे. भारतातील अनेक भागात कोरोनाच्या वृद्धीदरात वेगाने वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही काळासाठी ही वाढ असली तरी याचा वेग प्रचंड असू शकतो असा दावा केंब्रिज विद्यापीठाचे प्राध्यापक पॉल कट्टूमन (Paul Kattuman) यांनी केला आहे.

कोविड १९ इंडिया ट्रॅकर (Covid 19 India Tracker) तयार करणारे केंब्रिज विद्यापीठाचे (Cambridge University) प्राध्यापक कट्टूमन यांनी ईमेलच्या माध्यमातून म्हटलं की, भारतात दरदिवशीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसण्याची शक्यता आहे. भारताला कोरोनाच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागू शकतो. मात्र ही लाट कमी कालावधीसाठी असेल असंही त्यांनी म्हटलं. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं म्हटलं आहे. काही दिवसांत, तसंच येत्या आठवड्यातसुद्धा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होईल. एका दिवसात किती रुग्ण सापडतील याचा अंदाज व्यक्त करणं सध्यातरी कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कट्टूमन आणि त्यांच्या कोविड ट्रॅकर टीमला भारतातील संसर्ग दर वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ट्रॅकरच्या माध्यमातून समजतं की, २५ डिसेंबरला प्रतिदिन वाढ ही निगेटिव्ह होती. साधारणत: - ०.४ इतकी नोंद झाली होती. मात्र २६ डिसेंबरला हेच प्रमाण ०.६ तर पुढच्या तीन दिवसात ५ टक्क्यांवर पोहोचली. यामुळे भारतातील ११ राज्यातील परिस्थिती चिंता वाढवणारी आहे.

हेही वाचा: मुलांच्या लसीकरणाला मोठा प्रतिसाद, पहिल्याच दिवशी लाखोंची नोंदणी

ब्रिटनचं उदाहरण देताना कट्टुमन यांनी म्हटलं की, डिसेंबरच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये नव्या रुग्णांचा दर शून्यावर होता. तर १३ डिसेंबरला हाच दर १.५ टक्क्यांवर पोहोचला. तर १८ डिसेंबरला हा दर ७.५ टक्के इतका झाला होता. आता वेगाने व्हायरस पसरत चालला आहे. ब्रिटनमधील परिस्थिती पाहता भारतात तो किती वेगाने पसरू शकतो याचा अंदाज बांधता येईल. भारताची लोकसंख्यासुद्धा जास्त असल्यानं याचं प्रमाण जास्त असू शकतं.

भारतातील सध्याची परिस्थिती पाहिली तर आणखी वातावरण बिघडत चाललं आहे. ओमिक्रॉनचं संकट वेशीवर असताना कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दोन आठवड्यापूर्वी ८ हजारांवर पोहोचलेली रुग्णसंख्या आता २० हजारांच्या वर आढळत आहे.

Web Title: Omicron No Any State Will Be Escape Says Cambridge Professors Who Work On India Covid 19 Tracker

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top