जाणून घ्या, ओमिक्रॉनचा उप-प्रकार BA.4 चा भारताला किती धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test

जाणून घ्या, ओमिक्रॉनचा उप-प्रकार BA.4 चा भारताला किती धोका

हैदराबाद : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची चिंता कमी होत नाही तोच भारतामध्ये आता ओमिक्रॉनच्या नव्या उप व्हेरिएंट BA.4 विषाणूची लागण झालेल्या पहिल्या रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. हैदराबाद येथे या विषाणूची लागण झालेल्या पहिल्या रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. भारतीय रूग्णांमध्ये कोविडचे नवीन प्रकार ओळखण्यावर काम करणाऱ्या INSACOG च्या डेटावरून ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांसह आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट BA4 ची लागण झालेला रूग्ण दक्षिण आफ्रिकेतून भारतात आला होता. त्यानंतर 9 मे रोजी त्याचे नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर आता जीनोम सिक्वेंसिंगमध्ये या व्यक्तीला ओमिक्रॉनच्या BA4 या व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आले आहे. संबंधित व्यक्ती 9 मे रोजी दक्षिण आफ्रिकेतून हैदराबादमध्ये आली होती. त्यानंतर 16 मे रोजी ती परत दक्षिण अफ्रिकेकडे रवाना झाली. विशेष म्हणजे नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणताही लक्षणे आढळून आलेली नाहीत.

दरम्यान, नव्या व्हेरिएंटचा रूग्ण भारतात आढळून आल्यानंतर देशातील इतर भागातही BA4 ची लागण झालेले रूग्ण आढळून येऊ शकतात अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, ओमिक्रॉनचा BA.4 हा सब व्हेरियंट वेगाने भारतात पसरण्याची शक्यता आहे.

भारताला किती धोका?

ओमियक्रॉनचा BA.4 सब-व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात असून, हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे BA.4 व्हेरिएंटचा भारतातील नागरिकांना अधिक धोका नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Omicron Sub Variant Ba4 First Case Reported In Hyderabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top