रात्रीचा कर्फ्यू
रात्रीचा कर्फ्यूरात्रीचा कर्फ्यू

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात ‘रात्रीचा कर्फ्यू’

ओमिक्रॉन देशात वेगाने पसरत आहे. आतापर्यंत तीनशेहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत

ओमिक्रॉन (Omicron) देशात वेगाने पसरत आहे. आतापर्यंत तीनशेहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. राज्यांमध्ये दररोज येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा वाढता प्रसार पाहता उत्तर प्रदेशामध्ये (Uttar pradesh) रात्रीच्या कर्फ्यूचे (Night curfew) लागू करण्यात येणार आहे. योगी सरकारने (Yogi Adityanath) शनिवारपासून (ता. २५) रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू लागू केला आहे. सोबतच विवाह सोहळ्यात दोनशेहून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यावर बंदी घातली आहे.

कोरोना विषाणूचा नवीन प्रकार पाहता लखनऊमध्ये कलम-१४४ आधीच लागू करण्यात आली होती. सोबतच राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. सीएम योगी यांनी अधिकाऱ्यांना ओमिक्रॉनबाबत सतर्क करताना सरकारी रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढवण्यास आणि इतर आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

रात्रीचा कर्फ्यू
शाळांना पुन्हा टाळे? कोरोनाची दहशत परतली; शंभर विद्यार्थ्यांना लागण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्य सरकारांसोबत बैठक घेतली. ज्यामध्ये त्यांनी कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी त्यांची तयारी वाढवण्याच्या सूचना दिल्या. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत आरोग्य मंत्रालयाने राज्यांना काय सल्ला दिला आहे, हे पंतप्रधानांना सांगितले. ओमिक्रॉनचा (Omicron) प्रसार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की त्यांनी जिल्हास्तरावरही राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणा बळकट करावी. ऑक्सिजन पुरवठा उपकरणे योग्यरीत्या स्थापित करणे आणि चांगल्या कार्य क्रमाने असणे खूप महत्त्वाचे आहे.

रात्रीचा कर्फ्यू
मांझी यांना वादग्रस्त वक्तव्य भोवणार; हिंदू संघटना आक्रमक

ख्रिसमस,नवीन वर्षाच्या उत्सवाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्याच्या दृष्टीने राज्यात कडक बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. संसर्गावर मात करण्यास दक्षतेची गरज आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी मॉल्स, सिनेमा हॉल, हॉटेल, कॅफे आणि गर्दीच्या ठिकाणी अधिक दक्षता घेतली जाईल. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांमध्ये कोविड प्रोटोकॉल, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क अनिवार्य असतील. राज्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील जनतेला नवीन विषाणूच्या प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी लसीकरण वेगाने केले जात आहे, असे योगी आदित्यनाथ (Uttar pradesh) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com