Election Commission: निवडणूक आयोगाने भाजपसह इतर पक्षांच्या ४ पोस्ट सोशल मिडीयावरून हटवल्या; काय आहे कारण?

Election Commission: निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आम आदमी पार्टी, भाजपसह चार जणांच्या निवडणूक पोस्ट सोशल मिडीयावरून हटवल्या आहेत.
Election Commission
Election CommissionEsakal

Election Commission: देशात निवडणूकांचे वारे वाहू लागले आहे. सर्व पक्षांनी सभा, प्रचार, दौरे यांची जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात, निवडणूक आयोग राजकीय पक्षांच्या भाषणांसह त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर सतत लक्ष ठेवून आहे. या दरम्यान, ECI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला चार निवडणूक पोस्ट काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

आम आदमी पार्टी, वायएसआर काँग्रेस, एन चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडून या पोस्ट टाकण्यात आलेल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, या सर्व सोशल मीडिया पोस्ट आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल काढून टाकण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, एक्सने या पोस्ट सोशल मिडीयावरून हटवल्या असल्या तरी, याबाबत बोलताना त्यांनी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

Election Commission
Chhattisgarh: लोकसभा मतदानापूर्वी BSF ची मोठी कारवाई, 29 नक्षलवादी ठार! मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

निवडणूक आयोगाने सांगितल्यानंतर X ने या पोस्ट सोशल मिडीयावरून हटवल्या आहेत. त्यानंतर एक्सने पुढे म्हटले की, भारतीय निवडणूक आयोगाने राजकीय नेते, पक्ष, आणि निवडणुकीचे उमेदवारांच्या भाषणाच्या पोस्टवरती कारवाई करत ते हटलण्याचे आदेश दिले आहेत, या सूचनेचे पालन करत आम्ही त्या पोस्ट सोशल मिडीया एक्सवरून हटवले आहेत.

याबाबत एक्सने म्हटले आहे की. आम्ही या कारवाईबाबत असहमत आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अतंर्गत इतर पोस्ट किंवा भाषणाप्रमाणे या पोस्ट देखील विस्तारीत केल्या गेल्या पाहिजेत.

Election Commission
EVM-VVPAT Verification: "सुधारणा असतील तर सुचवा, मात्र उगाच..."; EVM व VVPAT संदर्भात सुप्रीम कोर्टाने सुनावले

दुसरीकडे, X च्या टिप्पणीवर निवडणूक आयोगाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अशा कारवाईवर निवडणूक आयोगाने चार निवडणूक पोस्ट काढून टाकल्याचे स्पष्ट केले. ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत होते. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या वैयक्तिक जीवनावर टीका करण्याची परवानगी देऊ शकत नाही. याशिवाय अशा आरोपांना कोणताही आधार नाही. त्यामुळे आदेशात अशा पोस्ट्सना प्रतिबंधित केले जाऊ शकते.

Election Commission
Trust of Nation: काँग्रेसची डोकेदुखी वाढणार? ट्रस्ट ऑफ नेशनच्या सर्वेक्षणात 64 टक्के लोकांना पुन्हा PM हवेत मोदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com