मोदी-पोप भेटीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणाला; “अशा भेटींमुळे आपल्या…”

मोदी-पोप भेटीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणाला; “अशा भेटींमुळे आपल्या…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु असेलल्या पोप फ्रान्सिस यांची व्हॅटिकन सिटीमध्ये भेट घेतलीये. त्यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून गोवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या भेटीचं महत्त्व वेगळं असल्याचं मानलं जातंय. पंतप्रधान मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मात्र, जगात सर्वाधिक संख्या असलेल्या ख्रिश्चन धर्मियांच्या रोमन कॅथलिक पंथाच्या प्रमुखाची भेट घेणं भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रुचलंय का? असा सवाल उपस्थित होत होता. संघांची यावर काय प्रतिक्रिया आहे, याबाबत उत्सुकता होती. याबाबत आता संघाने स्वत:चं आपली भूमिका मांडली आहे.

काय घडलं बैठकीत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅटिकन सिटी येथे पोहोचल्यानंतर पोप फ्रान्सिस यांच्याशी त्यांची बैठक पार पडली. त्या दोघांचीच ही भेट शिष्टमंडळस्तरीय चर्चेच्या अगोदर झाली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी कोविडच्या समस्यांसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर देखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक केवळ 20 मिनिटांची होती मात्र तासभर चालली. यावेळी मोदी आणि पोप यांनी आपल्या पृथ्वीला अधिक चांगले बनवण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये हवामान बदलाशी लढा देणे आणि गरिबी दूर करणे या विषयांचा समावेश होता.

काय म्हणाला संघ?

मोदी-पोप यांच्या भेटीवर संघाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी म्हटलंय की, या भेटीमधून भारताचाच सन्मान अधिक वाढला आहे. जर देशाच्या सरकारच्या प्रमुखांनी जगात सध्या असणाऱ्या नागरी जीवनामधील सर्वोच्च स्थानी असणाऱ्या व्यक्तीची भेट घेतली तर त्यात गैर काय आहे? असं त्यांनी म्हटलं. पुढे त्यांनी म्हटलं की, आपण सर्वजण हे वसुधैव कुटुम्बकम या विचारसणीवर विश्वास ठेवणारे आहोत, आपण सर्व धर्मांचा सन्मान करतो. अखिल भारतीय कार्यकारणी मंडळाची तीन दिवसीय बैठक संपल्यानंतर सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी हे भाष्य केलंय.

भेट घेणारे मोदी पहिले पंतप्रधान नाहीत!

दरम्यान व्हॅटिकन सिटीला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे काही पहिले भारताचे पंतप्रधान नाहीयेत. त्यांच्याआधी अनेक पंतप्रधानांनी व्हॅटीकन सिटीला भेट दिली आहे. जवाहरलाल नेहरु यांनी जुलै १९५५ मध्ये व्हॅटिकन सिटीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी बारावे पोप पिऊस यांची भेट घेतली होती. इंदिरा गांधींनी देखील सन १९८१ मध्ये व्हॅटिकन सिटीला भेट दिली होती. यावेळी तत्कालिन पोप जॉन पॉल २ यांची भेट घेतली होती. आय. के. गुजराल यांनी सन १९९७ मध्ये व्हॅटिकनच्या दौऱ्यावर होते यावेळी देखील पोप जॉन पॉल २ हेच सर्वोच्च धर्मगुरुच्या स्थानी होते. अटल बिहारी वाजपेयी हे सन २०२० मध्ये वाजपेयी इटलीच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी व्हॅटिकन सिटीला भेट दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com