थंडीत, महाराष्ट्र सदनात...गार पाण्याच्या अंघोळीची पर्वणी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra sadan
थंडीत, महाराष्ट्र सदनात...गार पाण्याच्या अंघोळीची पर्वणी!

थंडीत, महाराष्ट्र सदनात...गार पाण्याच्या अंघोळीची पर्वणी!

sakal_logo
By
मंगेश वैशंपायन -सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत सकाळी सकाळी थंडगार पाण्याने अंघोळ करण्याचे ‘सुख’ अनुभवायचे असेल तर राजधानीतील पंचतारांकित नवीन महाराष्ट्र सदनात भेट द्या...येथील सौरऊर्जेवर चालणारी पाणी गरम करण्याची यंत्रणाच बिघडल्याने येणाऱ्या पाहुण्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या उद्‍भवल्याचे सदनाच्या प्रशासनाने मान्य केले आहे.

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त श्‍यामलाल गोयल यांनी, पाणी गरम करण्याच्या यंत्रणेत काही बिघाड झाल्याचे मान्य केले. सौरऊर्जा संयंत्रे सदनाच्या मुख्य वाहिनीशी जोडणाऱ्या यंत्रणेतील बिघाडामुळे ही समस्या उद्‍भवली होती.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

नळातून लाल पाणी

वातानुकूलित खोल्यांमधील बाथरूममध्ये नळास चक्क लाल पाणी येते. बहुतेक वेळा पाण्याला दुर्गंधीही येते. आयुक्त श्‍यामलाल गोयल यांनी, नळाला लाल पाणी येण्याची समस्या गेल्या सहा वर्षांपासून असल्याचे सांगितले. मात्र याचे कारण कळतच नाही असेही त्यांनी सांगितले. प्रशासन हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे गोयल म्हणाले.

loading image
go to top