आता टाटास्काय आणि एअरटेल डिश टीव्हीवर भरणार शाळा; अर्थमंत्र्यांची घोषणा

वृत्तसंस्था
Sunday, 17 May 2020

कोरोनाचे मोठे संकट भारतासाठी एक इशारा आहे, तो संदेश आणि संधी घेऊन आला आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा म्हटलं आहे.

नवी दिल्ली : आत्मनिर्भर देशासाठीचा निर्धार सिद्धीला नेण्यासाठी केंद्र सरकारकूडन आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये भर देण्यात येत आहे. कोरोनाचे मोठे संकट भारतासाठी एक इशारा आहे, तो संदेश आणि संधी घेऊन आला आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा म्हटलं आहे. अर्थमंत्र्यांची ही आजची पाचवी पत्रकार परिषद होती. भारतीय अर्थव्यवस्थेपुढं ही एक संधी असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवेदनात व्यक्त केलं होतं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

आज सरकारकडून ७ उपाय करणार आहोत. यात मनरेगा, ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य, शिक्षण, व्यवसाय आणि कोरोना, कंपन्यांचा अधिनियमितकरण, व्यवसाय सुलभ करणे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, राज्य सरकारची स्त्रोत यांचा समावेश आहे. तसेच, शिक्षकांचे लाईव्ह वर्ग चॅनेलवर दाखवण्यात येणार आहेत, टाटास्काय व एअरटेलही शैक्षणिक व्हिडीओ दाखवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी १२ ऑनलाइन चॅनेल 
ई-पाठशालांतर्गत २०० नवी पुस्तके आणली असून, विद्यार्थ्यांसाठी १२ ऑनलाइन चॅनेल सुरु करणार आहोत, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकारकडून सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात क्य़ूआर कोडच्या माध्यामातून टेक्स्टबुक उपलब्ध करून देण्यात येतील. वन नेशन, वन डिजिटल प्लॅटफॉर्मअंतर्गत सर्व वर्गाचा अभ्यासक्रम ऑनलाईन करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्गाचा एक वेगळा वर्ग बनविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी रेडियो, कम्युनिटी रेडियो आणि पॉडकास्टचाही उपयोग करण्यात येणार आहे. सोबतच अपंग विद्यार्थ्यांसाठी इ-कटेंट तयार करण्यात येणार आहे. निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या पाचव्या पत्रकार परिषदेत या सर्व घोषणा केल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी सरकार सर्वोत्परी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी घोषित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One channel for one class FM announces help for students who don't have internet access