esakal | राम मंदिर उभारणीसाठी उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

राम मंदिर उभारणीसाठी उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा

'महाराष्ट्र भवन'साठी जागा द्यावी

राम मंदिर उभारणीसाठी उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अयोध्या : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आता शिवसेनेकडून एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे, याबाबतची माहिती शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अयोध्या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावर ते म्हणाले, राम मंदिर होईल की नाही, ते कोण बनवेल याबाबत आधी चर्चा सुरु होती. तेव्हा शिवसेनेची मागणी होती की केंद्र सरकारने राम मंदिराच्या निर्मितीसाठी कायदा बनवावा. तो कायदा तर झाला नाही. मात्र, आता हा प्रश्न सुटला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, 2018 मध्ये मी पहिल्यांदा इथं आलो होतो. त्यानंतर मी पुन्हा इथं येईन, असं म्हटलं होतं. त्यामुळे आज पुन्हा अयोध्येत येणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. 

'महाराष्ट्र भवन'साठी जागा द्यावी

मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्रातून अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा द्यावी, असे आवाहनही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केले आहे.  

loading image