आता पर्यटक शौचालयं पाहायला भारतात येतील : मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पर्यटक युरोपात घरांच्या सुंदर रंगवलेल्या भिंती पाहायला जातात. तसेच आता एक दिवस असा येईल देशातील शौचालयं इतकी स्वच्छ आणि सुंदर होतील की ती पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक गर्दी करतील.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : पर्यटक युरोपात घरांच्या सुंदर रंगवलेल्या भिंती पाहायला जातात. तसेच आता एक दिवस असा येईल देशातील शौचालयं इतकी स्वच्छ आणि सुंदर होतील की ती पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक गर्दी करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

हरियानातील कुरुक्षेत्र येथे आयोजित 'स्वच्छ शक्ती 2019' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महिलांशीही संवाद साधला. ते म्हणाले, जेव्हा मी लाल किल्ल्यावरुन 'स्वच्छ भारत अभियाना'ची घोषणा केली होती. तेव्हा विरोधकांनी माझी खिल्ली उडवली. त्यावेळी माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांना महिलांची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत नाही. 

दरम्यान, मोदींचा दौरा राजकीय नसल्याचे राज्य सरकार आणि प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, मोदींनी यावेळी विरोधकांना लक्ष्य करत प्रचाराचे बिगुल फुंकले.

Web Title: One day tourists will come to India to see toilets says PM Narendra Modi