भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू करण्याच्या कराराला शंभर दिवस पूर्ण

जनरल नरवणे यांचे काल दोन दिवसाच्या काश्‍मीर दौऱ्यासाठी आगमन झाले. या दौऱ्यात ते काश्‍मीरमधील सुरक्षा स्थितीचा आढावा घेत आहे.
Manoj Narwane
Manoj NarwaneSakal

श्रीनगर - लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Manoj Narwane) यांनी आज काश्‍मीरच्या (Kashmir) नियंत्रण रेषेलगच्या सुरक्षा स्थितीचा (एलओसी) (LOC) आढावा घेतला. उभय देशात शस्त्रसंधी (Arms) असून ती आणखी किती काळ सुरू ठेवायची हे सर्वस्वी पाकिस्तानवर (Pakistan) अवलंबून आहे, असे नरवणे यांनी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू करण्याच्या कराराला शंभर दिवस पूर्ण झाले. (One Hundred Days to Complete the Arms Embargo Agreement between India and Pakistan)

जनरल नरवणे यांचे काल दोन दिवसाच्या काश्‍मीर दौऱ्यासाठी आगमन झाले. या दौऱ्यात ते काश्‍मीरमधील सुरक्षा स्थितीचा आढावा घेत आहे. आज दुसऱ्या दिवशी त्यांनी नियंत्रणरेषेलगत स्थितीचा आढावा घेतला. यावेळी नरवणे यांनी सुरक्षेचा आणि कोरोना स्थितीचा आढावा घेताना जवानांची पाठ थोपटली. परिस्थिती अशीच राहिली तर काश्‍मीरमधील जवानांची संख्या कमी होऊ शकते. सध्या शस्त्रसंधी सुरू आहे. परंतु ती कायम ठेवण्याची जबाबदारी पाकिस्तानवर आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रशासन, लष्कर आणि अन्य सुरक्षा संस्थांनी एकत्र काम केले आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत.

Manoj Narwane
मिल्खा सिंग यांची ऑक्सिजन पातळी घटली, ICUत दाखल

कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी जवानांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले. नरवणे यांना उत्तर कमांड प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी आणि लेप्टनंट जनरल डी.पी. पांडे यांनी सुरक्षेची माहिती दिली. दहशतवाद्यांचे जाळे मोडून काढण्यासाठी ओव्हर ग्राउंड वर्कर शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. युवकांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादी गटात सामील करून घेणाऱ्या कारवायांवर लक्ष ठेवले जात असून त्यांच्या मुसक्याही आवळल्या जात आहेत. दहशतवाद्यांनी शरण येण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com