नक्षलवाद्यांच्या IED स्फोटात CRPF च्या मराठी अधिकाऱ्याचा मृत्यू, सात जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

काल उशीरा रात्री नक्षलवादविरोधी ऑपरेशनसाठी हे आठ पोलिस गेले होते.

रायपूर : केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि कमांडो बटालियन फॉर रिझॉल्यूट ऍक्शन (CoBRA) चे असिस्टंट कमांडो एका हल्ल्याला बळी पडले आहेत. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर इतर 10 जण जबर जखमी झाले आहेत. माओवादी नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात हे जवान जखमी झाल्यामी माहिती आहे. शनिवारी रात्री छत्तिसगढमधील सुकमा जिल्ह्यातील तलमेटला प्रदेशात ही घटना घडली आहे. 

काल उशीरा रात्री नक्षलवादविरोधी ऑपरेशनसाठी हे पोलिस गेले होते. यापैकी दोन वरिष्ठ अधिकारी आहेत. नक्षलवाद्यांनी IED स्फोटकांनी हा हल्ला घडवून आणल्याची माहिती बस्तरचे IG सुंदराज पी यांनी दिली. 

हेही वाचा - तेलंगणा - AIMIM च्या अकबरुद्दीन ओवैसी आणि भाजप प्रदेशाध्यक्षांवर हेटस्पीच प्रकरणी गुन्हा दाखल

यातील आठ जखमींना पुढील उपचारांसाठी काल उशीरा रात्री पावणेएक वाजता रायपूरमधील हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी तातडीने नेण्यात आले. आज रविवारी सकाळी यातील असिस्टंट कमांडो नितीन भालेराव यांचा गंभीर जखमांमुळे उपचारांदरम्यानच मृत्यू झाला. इतर सात पोलिस हे सध्या कोणत्याही प्रकारच्या धोक्यातून बाहेर आहे. याबाबतची अधिक माहिती येणे बाकी आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one killed & Seven jawans injured by IED blast by Naxals near Tadmetla area of Sukma district