esakal | तेलंगणा - AIMIM च्या अकबरुद्दीन ओवैसी आणि भाजप प्रदेशाध्यक्षांवर हेटस्पीच प्रकरणी गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Aimim bjp

एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी आणि तेलंगणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष बांदी संजय यांच्याविरोधात हेट स्पीच प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

तेलंगणा - AIMIM च्या अकबरुद्दीन ओवैसी आणि भाजप प्रदेशाध्यक्षांवर हेटस्पीच प्रकरणी गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद - तेलंगणानमध्ये एसआर नगर पोलिस ठाण्यात एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी आणि तेलंगणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष बांदी संजय यांच्याविरोधात हेट स्पीच प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ग्रेटर हैदराबादद म्युनसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणूक प्रचारावेळी दोन्ही नेत्यांना भावना भडकावणारे भाषण केले होते. 

एसआर नगरचे पोलिस निरीक्षक सईदुलु यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांविरोधात कलम 505 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसा यांनी केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली होती. त्यांनी म्हटलं होतं की, हुसैन सागर तलावाच्या काठावर असलेल्या माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि टीडीपीचे संस्थापक एनटी रामाराव यांच्या समाधी हटवण्यात येणार का?

जलाशयाच्या जवळ राहणाऱ्या गरीब लोकांना हटवण्याच्या मोहिमेवर प्रश्न उपस्थित करताना अकबरुद्दीन यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तर भाजपने अकबरुद्दीन ओवैसी यांचे वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत माफी मागावी असंही म्हटलं होतं. 

हे वाचा - 'इंदिरांना मारलं तर मोदी काय चीज?', शेतकरी आंदोलनात खलिस्तानींच्या घोषणेचा खट्टर यांचा दावा

एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी दावा केला होता की, जेव्हा हुसैन शाह वली यांनी हा तलाव बांधला होता तेव्हा त्याचा काठ 4 हजार 700 एकर जमीनीवर पसरला होता. मात्र आता हा 700 एकर जमीनीवर राहिलेला नाही. यावर अकबरुद्दीन यांनी म्हटलं की, चार हजार एकर जमीन कुठं गेली. याठिकाणी नेकलेस रोड तयार केला, दुकाने बांधली, नरसिंह राव, एनटी रामाराव यांच्या समाधी असून लुम्बिनी पार्कही उभारलं आहे. तेलंगणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष बांदी संजय यांनी अकबरुद्दीन यांचे नाव न घेता पलटवार करताना म्हटलं होतं की, दोन्ही दिवंत नेत्यांची समाधी हटवण्याची हिम्मत आहे का?

loading image