

Air Pollution
sakal
नवी दिल्ली - ‘देशात प्रदूषणामुळे दरवर्षी दहा लाख लोकांचा मृत्यू होत असून, याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत आहे. जागतिक बॅंकेच्या अहवालातून याची पुष्टी होत असताना सरकार किती काळ या वास्तवाकडे दुर्लक्ष करणार आहे,’ असा सवाल काँग्रेसने केला आहे, तसेच प्रदूषणावर कठोर उपाययोजनांची गरजही अधोरेखित केली आहे.