Ahmedabad Plane Crash: जळालेली झाडे अन् काळवंडलेल्या भिंती; अपघाताला महिना झाल्यानंतर वसतिगृहाची स्थिती
Ahmedabad News: अहमदाबाद विमान अपघातानंतर एक महिना उलटूनही बी. जे. मेडिकल कॉलेज वसतिगृह परिसरातील जळालेली झाडे, भगदाड पडलेल्या भिंती आणि ढासळलेली रचना पाहायला मिळते. विद्यार्थ्यांना तात्पुरते दुसरीकडे हलवले असले तरी पुनर्बांधणीस सुरुवात झालेली नाही.
अहमदाबाद : जळालेली झाडे..! अर्धवट पडलेल्या आणि काळवंडलेल्या भिंती...! रिकामे आणि भकास दिसत असलेले वैद्यकीय रुग्णालयाचे आवार...एक महिन्यापूर्वी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर वैद्यकीय वसतिगृह संकुलाची अवस्था सध्या अशी आहे.