
'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक मंगळवारी (17 डिसेंबर) दुपारी लोकसभेत मांडले जाणार आहे. सरकारशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल लोकसभेत वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडणार आहेत. हे विधेयक 16 डिसेंबरला मांडले जाणार होते, मात्र ते मांडले जाऊ शकले नाही. भाजपने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना व्हीप जारी करून सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.