तिने फक्त एकदाच सांगावं माझ्यावर प्रेम नाही...

वृत्तसंस्था
Monday, 24 February 2020

तुम्ही मला कितीही मारा. तिने फक्त एकदाच सांगावं माझ्यावर प्रेम नाही. पण, युवतीने त्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केल्याची घटना येथे घडली आहे.

पाटना (बिहार): तुम्ही मला कितीही मारा. तिने फक्त एकदाच सांगावं माझ्यावर प्रेम नाही. पण, युवतीने त्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केल्याची घटना येथे घडली आहे.

मुलगी आईला म्हणाली मी प्रेग्नंट; आता काय करू...

शहरामधील एका युवतीचा विवाह ठरला असून, 2 मार्चला विवाह होणार आहे. पण, सुधीर कुमार नावाचा युवक युवतीच्या घरी गेला आणि आमचे प्रेमसंबंध असल्याचे सांगून गोंधळ घालू लागला. युवतीच्या कुटुंबियांनी त्याला बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकीत नेले. चौकीत घेऊन गेल्यानंतरही तो गोंधळ घालू लागला.

युवतीने रडत-रडत लिहीले वडिलांना पत्र; प्रेमात फसले...

सुधीर कुमार पोलिसांना म्हणाला, 'आमचे दोघांचे प्रेमसंबंध आहेत. परंतु, प्रेयसीचे कुटुंबियांनी जबरदस्तीने दुसरीकडे विवाह ठरवला आहे. तिने फक्त एकदाच सांगावं माझ्यावर प्रेम नाही. त्या क्षणी मी तिच्या आयुष्यातून बाजूला जाईल.'

लग्नाच्या तिसऱया दिवशी झाली मुलगी; पतीला धक्का...

सुधीर कुमारच्या वक्तव्यानंतर पोलिसांनी युवतीला चौकीत बोलावले. युवतीने सुधीर कुमार  हा त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली. पण, चौकीतच त्याने आत्महत्येचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांनी त्याला समाजावून सांगत शांत करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसाने युवतीला नको तिथे स्पर्श केला अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one sighted love a boy creats high voltage drama in girls home at bihar

Tags
टॉपिकस
Topic Tags: