मोठी बातमी - कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्राने उचललं पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

एक वर्षापूर्वी याच काळात कांद्याच्या किंमती 35 रुपये प्रति किलो इतक्या होत्या. कांदा बाजारात उपलब्ध होण्यासाठी आणि वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने गेल्या महिन्यात निर्यातीवर बंदी घातली होती.

नवी दिल्ली - सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, भाववाढ थांबवण्यासाठी सरकारने कांद्याच्या आयात नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. तसंच कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बफर स्टॉकपेक्षा जास्त कांदा बाजारात पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्यावतीने ही माहिती देण्यात आली.

कांद्याच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमतींनी शंभरी ओलांडली आहे. तर मंगळवारी चेन्नईमध्ये घाऊक बाजारात कांद्याच्या किंमती 73 रुपये प्रति किलो इतक्या झाल्या होत्या. दिल्लीत हीच किंमत 50 रुपये आणि कोलकात्यात 65 रुपये प्रति किलो इतका होता. मुंबईतही कांद्याचे दर 67 रुपये प्रति किलो इतके झाले आहेत. पावसामुळे कांद्याची आवक कमी झाल्याने पुरवठा होत नसल्यानं किंमती वाढल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

देशात महाराष्ट्र सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे. नाशिकमध्ये घाऊक बाजारात सध्या कांद्याची किंमत वाढून ती 66 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. एक वर्षापूर्वी याच काळात कांद्याच्या किंमती 35 रुपये प्रति किलो इतक्या होत्या. कांदा बाजारात उपलब्ध होण्यासाठी आणि वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने गेल्या महिन्यात निर्यातीवर बंदी घातली होती.

पावसाने प्रचंड नुकसान

केंद्र सरकारने कांद्याचे दर आवाक्यात राहावे यासाठी निर्यात बंदी घातली आहे. परंतु पावसाने कांद्याचे नुकसान झाले आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी होत आहे. तसेच मागील काही दिवसात झालेल्या सततच्या पावसाने कांद्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर नवीन कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये वाढ होत 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion price control government decide relaxation in import rule