
नवी दिल्ली : ‘बेटिंग ॲप’ आणि सेलिब्रिटींच्या जाहिरातींमुळे भारतात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत ऑनलाइन गेमिंग विधेयकाला बुधवारी मंजुरी दिली. या प्रस्तावित कायद्याचा उद्देश भारतातील ‘ऑनलाइन गेमिंग’ क्षेत्राचे कठोर नियमन करणे आणि ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’द्वारे होणारी सट्टेबाजी हा दंडनीय गुन्हा ठरवणे हे आहे. याशिवाय ‘ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्री’लाही प्रोत्साहन देण्याचे नियोजन आहे. काय आहे या विधेयकात?