esakal | Lockdown effect : 'बुक माय शो'ने 200 जणांना नोकरीवरुन काढलं
sakal

बोलून बातमी शोधा

Book-My-Show

Lockdown effect : 'बुक माय शो'ने 200 जणांना नोकरीवरुन काढलं

sakal_logo
By
शर्वरी जोशी

ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म book my showने त्यांच्या २०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात नुकसान सहन करावं लागत असल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. book my showचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हेमराजानी यांनी ट्विटरद्वारे याविषयी माहिती दिली आहे. (online-ticketing-platform-bookmyshow-lays-off-200-employees)

"इच्छा नसतांनादेखील book my show या कंपनीतून आम्ही २०० जणांना कामावरुन कमी केलं आहे. कोविड-१९ ने मला फार मोठी शिकवण दिली असून आज मी एक नवा धडा घेतला आहे. माझ्या डोक्यात २ विचार होते. पहिला लॉकडाउन संपण्याचा वाट पाहणं आणि दुसरा योग्य दिशेने काम करत राहणं", असं ट्विट आशिष हेमराजानी यांनी केलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी अन्यही काही ट्विट्स केले आहेत.

पुढे ते म्हणतात, "कंपनीतून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी शोधण्यासाठी आम्ही नक्कीच मदत करु. या कर्मचाऱ्यांनी आम्हाला प्रचंड साथ दिली आहे."

दरम्यान, यापूर्वीदेखील बूक माय शो या कंपनीतून २७० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आलं होतं. लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन तिकीट बुक करण्याचं प्रमाण कमी होईल या विचाराने कंपनीने २७० जणांना कमी केलं होतं.