
नवी दिल्ली - लॉकडाउनच्या (Lockdown) काळात दहाव्या वर्षापासूनच मुले स्मार्टफोन (Smartphone) वापरू लागले आहेत. परंतु ५९ टक्के मुले या फोनचा वापर मेसेजिंगसाठी करीत असून, केवळ १०.१ टक्के मुलांचा ऑनलाइन शिक्षणासाठी (Online Education) स्मार्टफोन वापरण्याकडे कल असल्याचे समोर आले. (Only 10 Percent of Children Use Mobile Phones for Education)
कोरोनामुळे लॉकडाउन लागू केला जात असल्याने देशातील सर्वच राज्यांतील शिक्षण सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर बाल हक्क संरक्षण आयोगाने मुलांवर मोबाईल आणि अन्य गॅझेटचा होणारा परिणाम यासंबंधी अभ्यास केला आहे. त्याची निरीक्षणे आयोगाने जाहीर केली आहेत. त्यानुसार दहा वर्षे वयोगटाच्या ३७.८ टक्के मुलांचे फेसबुक अकाउंट आहेत, तर २४.३ टक्के मुले इन्स्टाग्रामवर सक्रिय आहेत. सोशल मीडियासंबंधीच्या नियमांना हे धरून नाही. फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर अकाउंट काढायचे असेल, तर तेरा वर्षे वयाची अट आहे.
आयोगाने या अभ्यासासाठी देशाच्या सर्वच भागात नमुना सर्वेक्षण केले आहे. त्यासाठी पाच हजार ८११ जणांची मते जाणून घेण्यात आली. सहा राज्यांतील साठ शाळांमधील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या मते नोंदविली आहेत. कमी वयाच्या मुले सोशल मीडिया सक्रिय असल्याचा पुरावा या अभ्यासातून पुढे आला आहे. झोपण्यापूर्वी मोबाइलचा वापर केल्याने मुलांमध्ये झोपेचे विकार, निद्रानाश, चिंता, थकवा यांसारखे दुष्परिणाम होत असल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे. स्मार्टफोन हे मुलांना अभ्यासापासून दूर नेत असल्याचे मत ५४.१ टक्के शिक्षकांनी व्यक्त केले आहे. लहान मुलांकडून स्मार्टफोनचा गरजेपुरता वापर होण्यासाठी पालकांनी अधिक सजग झाले पाहिजे. या फोनपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी त्यांना इतर जीवन कौशल्य आत्मसात करायला लावले पाहिजेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
उपाय काय
मुलांना मोबाईलचे व्यसन लागत आहे. त्यावर आयोगाने काही उपाय सुचविले आहेत. मुलांना शारीरिक कसरती, मैदानी खेळांची सवय लावा, अनेक मोबाईलमध्ये वेबसाइट नियंत्रित करता येतात, त्याचा वापर पालकांनी करावा.
मुलांसमोर पालकांनी मोबाईलचा कमी वापर करावा. मुलांना जास्त मोबाइल वापराचे दुष्परिणाम वारंवार सांगावेत. मुलांमध्ये इंटरनेट सुरक्षा नियमाबद्दल जागृती करावी, अशा अनेक सूचना आयोगाने केल्या आहे.
सर्वेक्षणात सहभागी
३,४९१ विद्यार्थी
१,५३४ पालक
७५०+शिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.