esakal | पेगॅसस म्हणजे काय रे भाऊ! 15 टक्के भारतीयांनाच पक्की माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Pegasus Spyware

भारतातील सामान्य नागरिकांमध्ये पेगॅससबाबत जागरुकता आणि त्याची माहिती कितपत आहे हे आश्चर्यचकीत करणारं आहे.

पेगॅसस म्हणजे काय रे भाऊ! 15 टक्के भारतीयांनाच पक्की माहिती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पेगॅससच्या सहाय्याने पाळत ठेवल्याच्या प्रकरणाचे पडसाद संसदेतही उमटले. यामुळे संसदेचं कामकाजही सुरळीत होऊ शकलं नाहीय आणि याबाबत राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडु यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली. इस्रायलच्या एनएसओ ग्रुपच्या मालकीच्या पेगॅससचा वापर करून भारतातील काही पत्रकार, विचारवंत आणि राजकीय नेत्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप करण्यात येत आहे.

विरोधकांनी पेगॅससवरून मोदी सरकारकडे उत्तर मागितलं असून एकतर यावर चर्चा करा किंवा काहीच नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पेगॅसस प्रकरणात 300 जणांवर पाळत ठेवण्यात आली आहे. हा एक तांत्रिक मुद्दा असून तो कोरोना व्यवस्थापन, शेतकऱ्यांच्या आंदोलनाइतका मोठा नाहीय. मात्र तरीही भारतातील सामान्य नागरिकांमध्ये पेगॅससबाबत जागरुकता आणि त्याची माहिती कितपत आहे हे आश्चर्यचकीत करणारं आहे.

प्रश्नमने याबाबत भारतात एक सर्व्हे घेतला. 12 राज्यातील 356 जिल्ह्यात घेण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये 3 हजार 500 जणांनी सहभाग घेतला होता. या सर्व्हेत दोनच प्रश्न विचारले गेले होते. एक म्हणजे गेल्या काही दिवसात पेगॅसस मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. या बद्दल तुम्हाला काय माहिती आहे. या प्रश्नाला तीन पर्याय देण्यात आले आहे. 1. याबाबत काही ऐकलेलं नाही. 2 याबाबत ऐकलंय आणि ही कोरोनाची नवीन लस आहे. 3. हो याबद्दल ऐकलंय. लोकांच्या फोनच्या माध्यमातून हे एक पाळत ठेवणारं स्पायवेअर आहे.

हेही वाचा: Online Gaming: रम्मी, पोकरवरील बंदी उठवली

पेगॅससबद्दल माहिती असलेल्यांना आणखी एक प्रश्न विचारला गेला. त्यात असं विचारण्यात आलं की, मोदी सरकार सर्वसामान्यांवर पाळत ठेवण्यासाठी पेगॅससचा वापर करतंय असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नाला तीन पर्याय दिले होते. 1 देशातील नागरिकांवरही या स्पायवेअरचा वापर करून पाळत ठेवली जातेय. 2 मोदी सरकार नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी स्पायवेअर वापरत नाही. 3 माहिती नाही. असे पर्याय देण्यात आले होते.

प्रश्नमने घेतलेल्या सर्व्हेतून अशी माहिती समोर आली आहे की, फक्त 15 टक्के लोकांनाच पेगॅससबाबत माहिती आहे. देशातील बहुतांश जनतेला पेगॅससबाबत माहिती नाही. याआधीच्या सर्व्हेमध्येही असं दिसून आलं आहे की, दिल्लीत उपस्थित झालेले मुद्दे जनतेपर्यंत पोहोचत नाहीत.

हेही वाचा: लशींचे डोस मिक्स केले जाणार? सरकारचे संसदेत उत्तर

विशेष म्हणजे, ज्यांनी पेगॅसस म्हणजे काय हे जाणून घेतल्याचं म्हटलं आहे त्यातील बहुतेकांना असंच वाटतं की हे स्पायवेअर नव्हे तर कोरोनाची नवी लस आहे. ज्या राज्यात हा सर्व्हे घेण्यात आला त्यात दक्षिणेकडील राज्यांचाही समावेश होता. तिथेही पेगॅससबद्दल जागरूकता कमी असल्याचं या सर्व्हेत दिसून आलं आहे.

पेगॅससबद्दल माहिती असलेल्यांपैकी 40 टक्के लोकांना असं वाटतं की, मोदी सरकारने स्पायवेअरचा वापर फक्त राजकीय नेते आणि पत्रकारांवरच पाळत ठेवण्यासाठी नव्हे तर नागरिकांवरही पाळत ठेवण्यासाठी केला. इतर मुद्द्यांपेक्षा पेगॅससवर जास्त भर दिला जात असल्याचंही यातून दिसून आलं. पेगॅसस ही लोकांसाठी मोठी समस्या नसली तरी ज्यांना याबाबत माहिती आहे त्यांच्यासाठी ती गंभीर बाब असल्याचंही प्रश्नमच्या सर्व्हेत आढळले आहे.

loading image
go to top