जगात हाहा:कार, भारतात शांत! एका दिवसात केवळ 5326 नवीन कोरोना रुग्ण | Desh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates
जगात हाहा:कार, भारतात शांत! एका दिवसात केवळ 5326 नवीन कोरोना रुग्ण

जगात हाहा:कार, भारतात शांत! एका दिवसात केवळ 5326 नवीन कोरोना रुग्ण

कोरोनाच्या (Covid-19) नव्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटने जगभरात हाहा:कार माजवला आहे. जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या ओमिक्रॉनच्या धोक्‍याच्या पार्श्वभूमीवर भारतात (India) मात्र कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे, ही समाधानाची बाब आहे. गेल्या एका दिवसात देशात कोरोनाचे केवळ 5 हजार 326 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या सोमवारी हा आकडा 6 हजार 563 होता. (Only 5326 new cases of corona were found in India in a single day)

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आता देशात कोरोनाचे फक्त 79 हजार 97 सक्रिय रुग्ण आहेत, जे कोरोनाच्या एकूण प्रकरणांपैकी केवळ 0.24 टक्के आहे. आतापर्यंत देशात कोरोना संसर्गाचे एकूण 3 कोटी 47 लाख 52 हजार 164 रुग्ण आढळले आहेत.

त्याचबरोबर गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8 हजार 43 रुग्ण बरे झाले आहेत. यानंतर, आतापर्यंत देशातील कोरोनामधून बरे झालेल्यांची एकूण संख्या 3 कोटी 42 लाख 95 हजार 60 वर पोहोचली आहे. मात्र, गेल्या एका दिवसात कोरोनाने 453 जणांचा बळी घेतला आहे.

देशात ओमिक्रॉनची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण 170 ओमिक्रॉन रुग्ण आहेत, त्यापैकी बहुतेक एकतर लक्षणे नसलेले आहेत किंवा त्यांना सौम्य लक्षणे आहेत.

टॅग्स :covid 19updateomicron