
चारधाम यात्रेत फक्त हिंदूंना प्रवेश? धामींचे मोठे वक्तव्य
डेहरादून : उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत (Char Dham Yatra) केवळ हिंदूंच्या (Hindu) प्रवेशाबाबत सीएम पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. या यात्रेत फक्त हिंदूंनाच परवानगी द्यावी, अशी मागणी चारधामच्या यात्रेकरू पुजाऱ्यांकडून बऱ्याच दिवसांपासून केली जात होती, मात्र आता सीएम धामी यांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा देत चारधाम यात्रेत मोठ्या प्रमाणावर पडताळणीचे काम केले जाईल असे म्हटले आहे. त्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. (Pushkar Singh Dhami On Chardham Yatra)
हेही वाचा: Photos : पाकिस्तानच्या सर्वात स्टायलिश महिला मंत्री
चारधाममध्ये फक्त हिंदूंनीच प्रवेश करावा, अशी चारधामच्या तीर्थपुरोहितांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी आहे. चार धाम यात्रेत केवळ हिंदूंच्याच प्रवेशाचा मुद्दा हरिद्वारच्या धर्मसंसदेत उपस्थित करण्यात आला होता. ज्याला मंगळवारी सीएम धामी यांनीही पाठिंबा दिला. दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री धामी यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नसले तरी, त्यांच्या वक्तव्यावरून चारधाममध्ये इतर धर्माच्या लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली जाऊ शकते असे संकेत मिळत आहे. कारण त्यांनी साधु संतांद्वारे मांडलेल्या मागणीला पाठिंबा देत चार धाम यात्रेत पडताळणीचे काम मोठ्या प्रमाणावर केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबवून पडताळणी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: गुड न्यूज! अखेर ट्विटरला 'एडीट बटण' मिळणार, काय असेल खास? वाचा
शंकराचार्य परिषदेच्या अध्यक्षांनी लिहिले पत्र
दुसरीकडे, शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष आणि शांभवी धाम पीठाधीश्वर स्वामी आनंद स्वरूप यांनी उत्तराखंड सरकारकडे ही मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सीएम धामी यांना पत्रही लिहिले आहे. ते म्हणतात की, देवभूमी उत्तराखंड ही हिंदूंची जन्मभूमी, कार्यभूमी आणि ऋषीमुनींची तपश्चर्या आहे. देवभूमीचे रक्षण करणे हा त्यांचा धर्म आहे, त्यामुळे उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेदरम्यान अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अहिंदूंच्या ओळखीसाठी सरकारने परवाने आणि ओळखपत्रे द्यावीत. तसेच ही मागणी पूर्ण न झाल्यास त्यांच्या काली सेनेशी संबंधित कार्यकर्ते स्वतः याचे काम सुरू करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
3 मेपासून सुरू होणार चारधाम यात्रा
3 मे रोजी उत्तराखंडमधील गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रा सुरू होणार आहे. तर, 6 मे रोजी बाबा केदारनाथचे दरवाजे उघडणार असून, यावेळी मोठ्या संख्येने नागरिक येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी चारधामला भेट देण्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. पर्यटन विभागाने यंदा प्रथमच यात्रेकरूंची नोंदणी अनिवार्य केली आहे.
Web Title: Only Hindus Enter In Chardham Yatra Uttarakhand Cm Pushkar Singh Dhami Big Statement
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..