Judiciary Can Save India: "देशाला आता केवळ न्यायव्यवस्थाच वाचवू शकते"; 'या' मुख्यमंत्र्यानं व्यक्त केली खंत

भाजपतील चुकीच्या लोकांवर कारवाया होत नाहीत, असंही या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Supreme-Court
Supreme-Court
Updated on

नवी दिल्ली : देशाला आता केवळ न्यायव्यवस्थाच वाचवू शकते, असं खळबळजनक विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांनी हे विधान केलं आहे. गृहमंत्र्यांनी देशाला वाचवण्याऐवजी आमचं सरकार पाडण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोपही बॅनर्जी यांनी केला आहे. (Only judiciary can save the country says Mamata Banerjee)

बॅनर्जी यांनी म्हटलं की, अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. कारण मुदतीपूर्वीच माझं सरकार पाडण्याची धमकी त्यांनी दिली आहे. देशाचं संरक्षण करण्याऐवजी शहा माझं सरकार पाडण्यासाठी कट-कारस्थानं करत आहेत. जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा भाजप समाजांचं ध्रुवीकरण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपीही त्यांनी केला.

Supreme-Court
BMC Wards latest news: मुंबई महापालिकेबाबत मोठी अपडेट! हायकोर्टाचा ठाकरे गटाला दणका

दरम्यान, २०२४ मध्ये आम्ही एकत्र आलो तर भाजपचा नक्कीच पराभव होईल, असा विश्वासही ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे. भाजपतील चुकीच्या लोकांवर कारवाई होत नाही, त्यामुळं आता देशाला केवळ न्यायव्यवस्थाच वाचवू शकते असं मोठं विधान बॅनर्जी यांनी केलं आहे.

हे ही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com