केजरीवालांच्या शपथविधीचे कोणा-कोणाला निमंत्रण

वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

  • केजरीवाल यांच्या शपथविधीला राजकीय नेत्यांना निमंत्रण नाही

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे सन्मवयक अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला एकाही मुख्यमंत्र्याला किंवा राजकीय नेत्याला निमंत्रण दिले नसल्याचे आपचे वरिष्ठ नेते गोपाल राय यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. रविवारी (ता. १६) रामलीला मैदानावर होणारा हा सोहळा केवळ दिल्लीपुरताच मर्यादित असेल. अन्य राज्‍यांचे मुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार नाही, तर केजरीवाल यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्‍वास दाखविणाऱ्या दिल्लीच्या जनतेच्या उपस्थितीत ते शपथ घेतील, असे राय यांनी स्पष्ट केले.

आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी याबाबत केलेले ट्विटही गोपाल राय यांनी रिट्वीट केले आहे. सिसोदिया यांनी ट्विट करताना म्हटले होते की, १६ फेब्रुवारीला तुमचा मुलगा तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. तुमच्या मुलाला आशिर्वाद आणि विश्वास देण्यासाठी नक्की या. त्यानंतर राय यांनी दिल्लीच्या जनतेशिवाय कोणत्याही मोठ्या नेत्याला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण नसल्याचे स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only people of Delhi will be invited to Arvind Kejriwals oath-taking ceremony says Gopal Rai